पुणेमहाराष्ट्र

अनुसूचित जाती जमाती,आदिवासी यांच्याकरिता भूमिहीन शेतमजूर लाभार्थी शिबीर संपन्न.

अनुसूचित जाती जमाती,आदिवासी यांच्याकरिता भूमिहीन शेतमजूर लाभार्थी शिबीर संपन्न.

संजय ताटे, शिरूर, पुणे: ‘भीमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेश अविजित श्री. गोपाळराव तंतरपाळे दादा सरचिटणीस भीमशक्ती व नगरसेवक सभापती देहूरोड यांच्या मुख्य नेतृत्वाखाली अनुसूचित जाती जमाती भूमिहीन शेत मजूर लाभार्थी यांचे शिबिर दिनांक 9-3-2022 रोजी वार बुधवार तहसील कार्यालयात शिरूर येथे संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरुर श्री. सुरेश कुमार राऊत सर यांनी केले, व तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्रीमती गिरी गोसावी मॅडम यांनी केले, सूत्रसंचालन हे राष्ट्रपती पदक विजेते माजी सरपंच तानाजी राव कुरकुटे सर यांनी केले.

हे पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुण्यात दाखल; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण. 

या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक नगरसेवक व सभापती श्री. गोपाळराव तंतरपाळे साहेब यांनी केले, व या कार्यक्रमाचे नियोजन सहायक फौजदार श्री. सुरेश भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच सर्व मान्यवरांच्या वतीने शिबिरामध्ये उपस्थितांचे आभार प्रकट श्री. सुरेश भोसले साहेब यांनी व्यक्त केले, व शिबिरामध्ये फाशी, पारधी, यांना यावेळी जातीचे दाखले देण्यात आले.

तसेच उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, भूमिहीन, शेतमजूर, हे दाखले पण लाभार्थ्यांना लाभार्थी यांचे 250 प्रकरण तयार करण्यात आले, व तसेच पुणे जिल्हा या ठिकाणी तीनशे एकर शेत जमीन उपलब्ध हि करून घेण्यात आली. या अनुसूचित जाती जमाती भूमिहीन शेतमजूर शिबिर कार्यक्रमात आमचे “महाराष्ट्र न्यूज नेटवर्क” पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी संजय ताटे सर यांचाही सहभाग होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button