उस्मानाबादमहाराष्ट्र

आठ दिवसापासून बेपत्ता महिला; इम्रान मुल्ला व अमर चाऊस यांनी दाखवली…

आठ दिवसापासून बेपत्ता महिलेला घरी पोहचवुन सामाजिक कार्यकर्ते इम्रान मुल्ला व अमर चाऊस यांनी दाखवली माणुसकी

कळंब प्रतिनिधी : या बाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या काही दिवसापासून कळंब येथील बस स्थानकावर एक मुलगी फिरत होती ही मुलगी कोणालाही पैसे मागायची कोणालाही खायला मागायची मात्र काही ठेवा ओळखून तिच्या याच बोळसरपणाचा फायदा घेत तिची छेडछाड करत असत.

हीच बाब कळंब येथील हिमालया लॉज चे मालक विजय कदम यांना कळली त्यांनी तात्काळ सामजिक कार्यकर्ते अमर चाऊस यांना फोन करून सांगितले की भाई गेली 8 दिवस झाले कळंब बस स्टॉप वर एक मुलगी फिरत आहे बहुतेक ती मेंटल असणार आणि तिच्यावर बऱ्याच जणांनी वाईट नजरेने पाहिले आहे.

त्यांनी अमर चाऊस यांनी सांगितले की मला काय हा प्रकार योग्य वाटला नाही म्हणून मी आपणाला अपेक्षा ने कॉल केला आहे. तुम्ही या गोष्टीचा पाठ पुरावा करा.

मात्र अमर चाऊस हे त्यावेळी अंबेजोगाईत असल्या मुळे काहीच करू शकले नाही नंतर त्यांनी कळंबला आल्या वर कदम यांना विचारले तर ती मुलगी बस स्थानक मध्येच झोपते आणि लोकांना पैसे मागत फिरते असे सांगितले. त्यानंतर सदर महिलेला अमर चाऊस यांनी दयावान प्रतिष्ठाण चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इम्रान भाई मुल्ला यांना बोलवून घेऊन ताब्यात दिले.

तत्पुर्वी अमर चाऊस यांनी त्या महिलेची विचार पूस केली असता ती सांगत तर खूप काही होती पण समजत काहीच नव्हते घडीत सांगायची हैद्राबाद सासर आहे आणि माहेर कळंब पण कोणते कळंब ते नव्हती सांगत आणि माझे गाव जवळच आहे चाऊस मात्र परेशान झाले आणि शेवटी ठरवल की त्यांचं आधार कार्ड काडून अंगट्याचे ठसे घेऊन यांचं नाव काढायचं त्या महिलेला आधार कार्ड केंद्रा कडे घेऊन गेलो नाव वगैरे सर्व सांगत होती पण तिथे काय तिचे आधार कार्ड निघाले नाही मग काहीच कळेनासे झाले काय करावे??

त्यांचा मोबाईल पण कोणी तरी चोरलेला होता.त्यात सर्व संपर्क नंबर होते. त्यांच्या कडे एक बॅग होती त्यात पण काहीच पुरावे सापडले नाही शेवटी एक कॅरीबॅग सापडली ती होती कळंब जिल्हा यवतमाळ ता कळंब या कापड दुकानातील त्या कपड्याच्या दुकानदाराला कॉल केला सदरील ब्याग तुमच्या दुकानातील आहे हुसनापूर तुमच्या आस पास आहे का त्यांना लगेच होकार दिला.

त्यांना आम्ही सर्व प्रकार सांगितला त्या गावात बस ची व्यवस्था नाही ना कुठली व्यवस्था 400 लोक संख्या असलेली ती लोक वस्ती चे गाव होते त्यांना सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस व इम्रान मुल्ला यांनी विनंती केली की आपण त्यांच्या गावात संपर्क करा ते म्हणाले चालेल माझ्या स्तरावर मी प्रयत्न करेल.

नंतर त्या दुकानदार व्यक्तीचा कॉल आला सदरील मुलीला आई आहे एक छोटा भाऊ आहे वडील नाहीत आई मोल मजुरी करून परिवार सभाळते त्यांची हरवलेली कुठलीच तक्रार पोलीस स्टेशन मध्ये नाहीये त्यामुळे तुम्ही त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जावा..

आठ दिवसापासून बेपत्ता महिला; इम्रान मुल्ला व अमर चाऊस यांनी दाखवली...
आठ दिवसापासून बेपत्ता महिला; इम्रान मुल्ला व अमर चाऊस यांनी दाखवली…

त्या नंतर अमर चाऊस यांचा एक मित्र कळंब यवतमाळ मध्ये कृषी सहायक म्हणून आहे त्यांना संपर्क केला त्यांचे पण बरेच शेतकरी त्या गावचे संपर्कात होते त्यांनी पण त्यांच्या त्यांच्या स्तरावर खूप सहकार्य केले.

नंतर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलात घडलेला प्रकार सांगितला पोलिसांनी लागलीच सर्व चक्रे फिरवली आणि त्या महिलेच्या आईचा संपर्क झाला त्या महिलेचा भाऊ अजून चार जण दुसऱ्या दिवशी त्या मुलीला घेण्यासाठी आले.सर्व प्रोसेस करून दुसऱ्या दिवशी ती महिला तिच्या आई जवळ हुसनापूर ता कळंब जिल्हा यवतमाळ येथे सुख रूप पोहचली..

सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस व इम्रान मुल्ला यांनी त्या मुलीस विचारले तुम्ही इकडे कश्या तर त्यांनी सांगितले की मी हैद्राबाद ला माझ्या मुलाला घेण्यासाठी गेले माझा मुलगा आणि पती पण तिथे नव्हते त्यांच्या फोन पण स्विच ऑफ लागत होता घराला कुलूप होते म्हणून मी गावी परत जात होते मी माहूर बस स्त्यांड मध्ये होते कंडक्टर ला विचारले ही बस कळंब ला जाते का तर ते हो म्हटले पण त्यांना काय माहिती ते कळंब उस्मानाबाद चे नाही तर यवतमाळ च्या कळंब च विचारत होत्या म्हणून त्या बसल्या उस्मानाबाद च्या कळंब गाडीत आणि गेली 8 दिवस भटकत होत्या.

या महिलेने आपल्या कुटुंबीयांकडे बघताच तीला अश्रू अनावर झाले आणि ती महिला रडु लागली तर मदतीला आलेल्या सर्वांचे हाथ जोडून आभार व्यक्त करू लागली..

या मुलीच्या मदतीसाठी संकटकाळी देवदूत म्हणून सामाजिक कार्यकर्ते अमर (बाबु) चाऊस, दयावान प्रतिष्ठान चे अध्यक्ष इम्रान मुल्ला, सर्पमित्र इरफान (बबलू) शेख,कृषी सेवक कळंब यवतमाळ चंद्रकात चंदनशिवे, कळंब पोलीस स्टेशन चे हवालदार खामकर, तसेच विजय कदम यांचे खूप मोठे मार्ग दर्शन सहकार्य लाभले.

त्यांचे भाऊ व नातेवाईक आले होते, सूरज मांडरे भाऊ, सचिन मांडरे चुलत भाऊ, अतुल गौरव चौधरी. सर्व हुसनापूर गाव ता कळंब जिल्हा यवतमाळ या सर्वांच्या सहकार्य मुळेच हे सर्व शक्य झाले असे शेवटी अमर चाऊस व इम्रान मुल्ला यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button