उस्मानाबादसंपादकीय

एसटी कर्मचाऱ्यांना तुळजापूर चे आ. राणादादांनी केली जीवनावश्यक साहित्याची मदत..

एसटी कर्मचाऱ्यांना तुळजापूर चे आ. राणादादांनी केली जीवनावश्यक साहित्याची मदत..

परवेज मुल्ला, उस्मानाबाद: एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी आजपर्यंत 105 जणांनी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर गेल्या 127 दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनात अनेक कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेल्या गरजू कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे आ. राणाजगजितसिंह पाटील (आ. राणादादानी) यांच्यावतीने कळंब आगारातील आंदोलन स्थळावर जीवनावश्यक १००किराणा किटचे दि. ५ मार्च रोजी वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजित पिंगळे,रामहरी शिंदे, अरुण चौधरी,शिवाजी बाराते,उत्तम टेकाळे,संदीप बाविकर,नारायण टेकाळे,शंकर यादव,बाळासाहेब पवार,जीवा कुचेकर,इम्रान मुल्ला,अशोक क्षीरसागर, सुधीर कोकीळ,सौ.संगीता कोकीळ,विनोद चौधरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे व एसटी कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button