महाराष्ट्र

प्रभारी अधिष्ठाता डॉ. ऊदय मोहीते सर यांच्या हस्ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नोंदणी कार्डाचे वितरण संप्पन.

प्रभारी अधिष्ठाता डॉ. ऊदय मोहीते सर यांच्या हस्ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नोंदणी कार्डाचे वितरण संप्पन.

लातूर: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा तिसरा वर्धापन दिन, त्यानिमित्त लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी अधिष्ठाता डॉ. ऊदय मोहीते सर यांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन प्रभारी अधिष्ठाता डॉ. ऊदय मोहिते सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे नोंदणी कार्ड बालाजी भोसले, सर्जेराव गाढवे, रंगनाथ माने, बाळासाहेब कांबळे, गणपती कांबळे, या नोंदणीधारक लाभधारकांना वितरित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना समीतीने अध्यक्ष डॉ.मेघराज चावडा म्हणाले कि
23 सप्टेंबर 2021हा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा तिसरा वर्धापन दिन सदरील योजना राबविण्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विशेष योगदान आहे.

मागील आठ महिन्याच्या कोविड महामारीच्या कालावधिसह एकुण 3,500 गरजू व गरिब रुग्नांनी या योजनेचा लाभ घेतला. लातूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू असते तर आणखी जास्तीत जास्त रुग्णांना या योजनेचा लाभ घेता आला असता. केवळ वैद्यकीय मनुष्यबळा अभावी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू होण्यास विलंब होत आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 23सप्टेंबर 2018रोजी सुरू झाली, आणि महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही 1एप्रिल 2020पासुनया योजनेला सुरूवात झाली. या दोन्ही योजना एकत्रित पणे राबवण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत एकूण 213तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत एकूण 916 अजारांचा समावेश असल्याचे डॉ मेघराज चावडा यांनी सांगितले. पुढे बोलताना डॉ मेघराज चावडा म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत प्रती कुटुंब प्रतिवर्षी वैद्यकीय आर्थिक खर्चाची मर्यादा दीड लाख रुपये तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नोंदीत कार्डधारकांना प्रतिवर्षी प्रती कुटुंब 5 लाख रुपये आर्थिक वैद्यकीय खर्चाची मर्यादा आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी अधिष्ठाता डॉ.ऊदय मोहिते सर यांच्या हस्ते धन्वंतरीचे पुजन करण्यात आले.

प्रास्ताविक या योजनेचे अध्यक्ष डॉ. मेघराज चावडा यांनी केले. तर या योजनेची सविस्तर माहिती विभागीय व्यवस्थापक डॉक्टर संजय गटकुळ सर यांनी दिली. या वेळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष डोपे, डॉ. अनमोड सर, डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. मंगला शिंदे, डॉ. रणजीत हाके पाटील, डॉ. आनंद बरगले, तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अभ्यागत मंडळाचे सदस्य त्र्यंबक गुरुनाथ स्वामी यांचेसह आरोग्य मित्र हेमंत लोहारे, अनिल शिंदे, आनंदकुमार कापसे, जीशान कुरेशी, मुजफ्फर दामटे, स्वाती सूर्यवंशी, सचिन औसेकर, गुंडीबा खळे, रसूल पठाण, लक्ष्मण घुले आदी उपस्थित होते. आभार व समारोप संभाजी कल्याणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button