एम. आय. एम. पक्षाचे कळंब तालुकाध्यक्ष वाजेद काझी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांचा काॅग्रेस पक्षात जाहिर प्रवेश
MIM पक्षाचे कळंब तालुकाध्यक्ष वाजेद काझी यांचा काॅग्रेस पक्षात....

उस्मानाबाद : मुरूम येथिल विठ्ठल साई कारखाना येथे कळंब तालुक्यातील एम आय एम पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांचा कॉग्रेस पक्षात माजी मंत्री बसवराजी पाटील यांच्या उपस्थितीत व तालुका काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या नेतृत्वखाली एम आय एम चे कळंब तालुका प्रमुख वाजिद काझी, शहर कार्यकारी अध्यक्ष हनुमंत दोडके, आरेफ खान माजी तालुकाध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली असद आली सय्यद, वाजिद शेख, महेश मोहिते, अस्लम शेख, जनक महाजन, विनोद चव्हाण, तसेच महिला पदाधिकारी पुजा नकाते, सुनिता जाधव, कानाबाई जाधव, प्रेम नकाते, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांचा काॅग्रेस पक्षात माजी मंत्री बसवराजी पाटील यांच्या हस्ते हार घालुन काॅग्रेस पक्षात प्रवेश दिला.
या प्रसंगी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष खलिल सय्यद,जिल्हा उपाध्यक्ष भागवत धस,काॅग्रेस पक्षाचे कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार,काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा ज्योती सपाटे, तालुका महिला अध्यक्षा अंजली ढवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली यांचा प्रवेश झाला.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मुस्लिम धर्मातील सोफी संताची राहुल गांधी यांच्या सोबत परिसंवाद घडवून आणला या बद्दल खलिल सय्यद यांचा बसवराज पाटील यांच्या हस्ते हार शाल घालून सत्कार करण्यात आला. तसेच महिला वरील अत्याचार तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या अडी-अडचणी संदर्भात महिलांचे बचत गट, पिक विमा याविषयावर सविस्तर अशी चर्चा केल्या बद्दल कळंबच्या महिला तालुकाध्यक्षा अंजली ढवळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, युवक विधान सभा अध्यक्ष शशिकांत निर्फळ, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शहाजान शिकलगार, किसान सेल अध्यक्ष शिवानंद शिनगारे, माजी मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष विश्वंभर मैदाड, भाग्यश्री ढवळे आदी उपस्थित होते.