बीड मध्ये जर आघाडी चा धर्म पाळला नाही तर उस्मानाबाद मध्ये देखील हा धर्म पाळला जाणार नाही – ओमराजे निंबाळकर

ओमराजे निंबाळकर

बीड मध्ये जर आघाडी चा धर्म पाळला नाही तर उस्मानाबाद मध्ये देखील हा धर्म पाळला जाणार नाही – ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद: शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळात होऊ घातलेल्या नगर पालिका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने शिव सेनेने शिव संपर्क अभियान सुरू केलं आहे. याच शिव संपर्क अभियानाच बीड मध्ये आयोजन करण्यात आलं होतं, या अभियानाच्या प्रमुख स्थानी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती यावेळी निंबाळकर यांनी बीड मध्ये महा विकास आघाडीचा धर्म न पाळणाऱ्यावर सडकून टीका केली आहे.

महा विकास आघाडी सरकार हे तीन पक्षाच असून प्रत्येक पक्षाचा आपापला वाटा ठरलेला आहे, उस्मानाबाद मध्ये पालक मंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्या मुळे त्या ठिकाणी आम्ही आघाडी सरकार चा धर्म पाळत आहे. बीड मध्ये मात्र अनेक तक्रारी माझ्या पर्यंत आल्या आहेत.

PUNE CRIME | पुण्यातील वारजे येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी प्रेयसीला अटक..

या ठिकाणी आघाडीचा धर्म पाळला जात नसून शिव सैनिकांना त्रास दिला जात आहे या बद्दल मी बीडच्या पालक मंत्र्यांशी चर्चा केली असून हा विषय मुख्य मंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. बीडमध्ये जर आघाडीचा धर्म पाळला नाही, तर उस्मानाबाद मध्ये देखील हा धर्म पाळला जाणार नाही, असं मुख्य मंत्र्यांना सांगणार असल्याचं निंबाळकर म्हणाले आहेत

आम्हाला त्रास दिला तर योग्य वेळेला योग्य उत्तर देऊ, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ओमराजे निंबाळकर यांचे आवाहन

बीड जिल्ह्यातून ज्या तक्रारी माझ्या कडे आल्या आहेत त्या ऐकून माझं डोकं फिरलं आहे. आपलं तीन पक्षाचं सरकार आहे. त्या मुळे आम्हाला कोणी त्रास देऊ नका शेवटी दोन हात करायची वेळ जर आली तर त्या साठी देखील शिव सैनिक कमी पडणार नाहीत त्या मुळे आम्हाला त्रास दिला तर योग्य वेळे ला योग्य उत्तर देऊ असा इशारा देखील ओमराजे निंबाळकर यांनी बीड मध्ये शिवसेनेला विरोध करणार्‍या नेत्यांना दिला आहे.

पुण्याच्या कंपनीने बनवली ‘चोरी’ करून कोरोनाची लस! 7200 कोटी रु. दावा दाखल