कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला तालुकाध्यक्ष पदी सौ. अंजली ढवळे तर शहराध्यक्ष पदी सौ. विमल खराटे.

कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला तालुकाध्यक्ष पदी सौ. अंजली ढवळे तर शहराध्यक्ष पदी सौ. विमल खराटे

कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला तालुकाध्यक्ष पदी सौ. अंजली ढवळे तर शहराध्यक्ष पदी सौ. विमल खराटे.

कळंब: कळंब काँग्रेस तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मोहा रोडवरील काँग्रेस संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीस तालुक्यातील काँग्रेसचे नेते, युवक कार्यकर्ते, महिला काँग्रेस सेवादल, मागासवर्ग काँग्रेस, व्हि जे एन टी काँग्रेस, शेतकरी काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस, विधी व न्याय काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, आजी व माजी पदाधिकारी व इतर सेल अध्यक्ष व पदाधिकारी यांनी हजर राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी केले होते.

या बैठकीत कळंब तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसचा कार्याचा आढावा,बूथ नियोजन ,जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक,इतर सहकार निवडणुका व नवीन नियुक्त्या व चर्चा बाबत करण्यात आली. या आढावा बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास आप्पा शिंदे, माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस जिल्हाकार्याध्यक्ष खलील सय्यद सर, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, पक्ष निरीक्षक व जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास कामगार सेलचे अध्यक्ष दयानंद एडके, जिल्हा उपाध्यक्ष भगवंतराव धस, जिल्हा उपाध्यक्ष शंकर करंजकर जिल्हा सदस्य उद्धव धस, उपतालुका अध्यक्ष अॅड. मनोज चोंदे, माजी तालुका अध्यक्ष दिलीपसिंह देशमुख, पोपटराव आंबिरकर, युवक काँग्रेसचे उस्मानाबाद कळंब विधानसभा अध्यक्ष भैय्या निरफळ, अशोक भातलवंडे, प. स. माझी सभापती प्रभाकर जाधव, सुनील जाधव, अनिल माने, जिल्हा सचिव बाबुराव तवले बाळासाहेब महाजन, सेवादल यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अॅड. प्रणित डिकले, अल्पसंख्याक ता. अध्यक्ष शहाजन शिकलगार, ओबीसी अध्यक्ष हरिदास जाधव, मा. वर्ग अध्यक्ष अजित खलसे, तालुका उपाध्यक्ष संजय पवार.

तसेच शहराध्यक्ष रवीराज ओझा, सुरेश नाना मस्के, शहर सचिव अनंत घोगरे विशाल शितोळे, सुदर्शन देशमुख, बालाजी पवार, अंकुश गायकवाड, रवी माने, तात्या गायकवाड, लहू जाधव, लहू गायकवाड, रोहित कसबे, सुनील जाधव अनिल माने, मंजू जाधव, नासर शेख, कलीम तांबोळी, सौ. ज्योतीताई सपाटे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकारिणी या सर्व मान्यवर उपस्थितीत तालुका महिला काँग्रेस कमिटी जाहीर करण्यात आली.

सौ. अंजली ढवळे तालुकाध्यक्ष, सौ. शितल खंडागळे कामगार सेल तालुकाध्यक्ष, श्रीमती वैशाली धावारे तालुका उपअध्यक्ष, श्रीमती किर्तीमाला लोमटे तालुकासचिव, सौ. शिवकन्या फल्ले तालुका सहसचिव, सौ. संगीता पांचाळ तालुका कोषाध्यक्ष, सौ. विमल खराटे शहराध्यक्ष, सौ. इंदू तनपुरे उपशहराध्यक्ष, सौ. संध्या कदम शहरकोषाध्यक्ष, सौ. सुरेखा घुले शहर कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली याच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला तालुकाध्यक्ष पदी सौ. अंजली ढवळे तर शहराध्यक्ष पदी सौ. विमल खराटे.