व्यर्थ न हो बलिदान व काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क अभियान व जनसंपर्क कार्यालयाचे दि. १५ रोजी उद्घाटन.

व्यर्थ न हो बलिदान व काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क अभियान व जनसंपर्क कार्यालयाचे दि. १५ रोजी उद्घाटन.

व्यर्थ न हो बलिदान व काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क अभियान व जनसंपर्क कार्यालयाचे दि. १५ रोजी उद्घाटन.

कळंब, उस्मानाबाद: कळंब तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येत आहे की दि. 15/08/2021 रोजी कळंब येथील रंगिला चौकात जनसंपर्क अभियान व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

तरी या समयी युवक काँग्रेस, सेवा दल, महीला काँग्रेस, अल्पसंख्याक सेल, यंग ब्रिगेड सेवादल, मागासवर्गीय सेल, OBC सेल, किसान सेल व इतर सेलच्या सर्व पदाधिकाऱी व कार्यकर्ते तसेच आजी माजी जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक व सरपंच यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाच्या कमेटीचे जिल्हा अध्यक्ष धिरज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जि. प. विरोधीपक्ष नेते शरणजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जि. उपाध्यक्ष जि. संघटक राजाभाऊ शेरखाने, जि. उपाध्यक्ष दिलिप भालेराव, सेवादलचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, महिला जिल्हाध्यक्ष सौ.राजलक्ष्मी गायकवाड, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष करण साळुंके, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाअध्यक्ष खलील सय्यद, मा. वर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, OBC समाजाचे नेते धनंजय राऊत, यंग ब्रिग्रेड सेवादल जिल्हाअध्यक्ष ॲड प्राणित डिकले, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, विधी व न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विश्वजीत शिंदे, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष सयाजिराजे माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यालयाचे शुभारंभ व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ता. अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी केले आहे.