उस्मानाबाद

महिला मेळाव्यात कळंब येथे शेकडो महिलांचा काँग्रेसपक्षात प्रवेश.

महिला मेळाव्यात कळंब येथे शेकडो महिलांचा काँग्रेसपक्षात प्रवेश.

कळंब, उस्मानाबाद: आज रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोहारोड कळंब येथील काँग्रेस कार्यालयात महिला काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला, कळंब शहरातील विविध संस्थेच्या संघटनेच्या महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, व जिल्हा उपाध्यक्ष भागवत धस, कळंब शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड महिला आघाडीच्या ज्योती ताई सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.

या मेळाव्या मधील महिलांच्या विविध समस्या महिलांमधील जनजागृती महिला आरक्षण महिलांचा समाजातील अस्तित्व व राजकारणातील सहभाग या सर्व विषयावर चर्चा झाली, व केंद्र सरकारने केलेल्या जाचक दरवाढी संदर्भात घर चालवताना महिलांना स्वयंपाक गॅस दरवाढीतून होणारा त्रास या सर्व समस्या वर महागाई इंधन दरवाढ या सर्व समस्या वर सांगोपांग चर्चा झाली, व या मेळाव्या निमित्त अनेक महिलांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

त्यांची नावे खालील प्रमाणे इंदू तनपुरे, अंकिता देशमुख, शैला चोंदे, सोनाली शिंदे संध्या कदम, प्रमिला बोराडे, शकुंतला माकोडे, वैशाली धावारे, आरती गव्हाणकर, अश्विनी सुरवसे, पार्वती कवडे, राणी यादव, सारिका लांडगे, सुजाता दीक्षित, मीरा दोडके, माया माने, दैवशाला पाटोळे, सुकेशिनी सावंत, गिरीजा गरड, सुनंदा काळे रेखा कसबे, प्रीती कुचेकर, निर्मला कसबे, रीना खिल्लारे, दैवशाला पाटोळे, इंदुबाई उखाडे, चांदणी कांगणे,

दैवशाला ठेवले, आयशा पठाण, शबनम शेख रजिया शेख, अंजुम शेख, नौशाद शेख, जमीन सय्यद फराह शेख, आयेशा पठाण, शबनम शेख, आली मून शेख, सीमा हळे, अशा पांचाळ, ज्योती पांचाळ जाकिर चाऊस, शाहीन सय्यद, नसरीन शेख, शीला घाडगे, बेबी पिंगारे आदिसह महिला घेतला. शितल गायकवाड प्रेमा भीम धीमेधीमे शोभा गिरी कमल पुरी आदी महिलांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button