राजकीय द्वेषापोटी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल कळंबमध्ये चक्काजाम आंदोलन

राजकीय द्वेषापोटी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल कळंबमध्ये चक्काजाम आंदोलन.
कळंब, उस्मानाबाद: काल दि.२४. ऑगस्ट रोजी राज्यातील महा विकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत असंविधानिक पद्धतीने अदखल पात्र अशा गुन्हात केंद्रीय मंत्री मा. ना. नारायणरावजी राणे साहेब यांना अटक केली. एकीकडे राज्यात बलात्कार, खुण, बेकायदेशीर वसुली यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून देखील सरकार मधील ख्यातनाम मंत्री मोकाट फिरत असताना केवळ राजकीय द्वेषापोटी राणे साहेबांवर खोटा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी कळंब यांच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लक्षणीय चक्काजाम आंदोलन करून मा. नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे साहेब यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी साहेब यांच्या कडे निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, रामहरी शिंदे, अरुण चौधरी, पंडितराव टेकाळे, संजय पाटील, रोहित कोमटवार, संतोष कस्पटे, माणिक बोंदर, संजय जाधवर, संदीप बाविकर, शिवाजी गिड्डे पाटील, मकरंद पाटील, मतीन पटेल, भगवान ओव्हाळ, शिवाजी शेंडगे, रामकिसन कोकाटे, जीवा कुचेकर, गोपाळ चोंदे, बाबुराव शेंडगे, अमोल माकोडे, परशुराम देशमाने, अनिल शेळके, विशाल ठोंबरे, मनोज पांचाळ,
अशोक महाजन, भाऊसाहेब लांडगे, सतीश वैद्य, महादेव पालवे, नारायण टेकाळे, मतीन पटेल, खंडेराव मेंदाड, गोविंद अडसूळ, संतोष सांगळे, अमोल चोरघडे, बापू माने, अशोक क्षीरसागर, इम्रान मुल्ला, करण गायके, युवराज पिंगळे, रियाज पठाण, सिद्धार्थ भोसले, धम्मा गायकवाड शिवाजी वाघमारे व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.