महाराष्ट्र

खाकी वर्दीतील माणूस! सापडलेले पैशाने भरलेले पाकीट सुपूर्द.

खाकी वर्दीतील माणूस! सापडलेले पैशाने भरलेले पाकीट सुपूर्द.

परवेज मुल्ला, उस्मानाबाद: कळंब शहरातील गजबजलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोमवारच्या आठवडी बाजाराच्या निमित्ताने बाजार तुडुंब भरलेला, वाहतूक सुरळीत रहावी म्हणून शहर वाहतूक खाकी वर्दीतील पोलिस डोळ्यात तेल घालून आपले कर्त्यव्य बजावत होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्त्यव्यास असलेले शहर वाहतूक कर्मचारी फरहान पठाण हे आपले वाहतूक नियमनाचे कर्त्यव्य बजावत असतांना त्यांना चौकात बाजूला एक पाकीट पडलेले दिसले. त्यांनी सदर पाकीट उचलून पाहणी केली असता त्यात त्यांना सहा ते सात हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे दिसली. त्यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता त्यांच्या असे लक्षात आले की सदर पाकीट केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील आप्पासाहेब यादव यांचे आहे.

या वेळी पोलीस कर्मचारी फरहान पठाण यांनी आप्पासाहेब यादव यांच्याशी संपर्क साधला व कळंबला बोलावून छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे पाकीट, एटीएम व महत्त्वाची कागदपत्रे सुपूर्त केली. त्यावेळी यादव यांनी सांगितले की हरवलेले पाकीट मी खूप हूडकले, मात्र मला सापडले नाही. यानंतर यादव यांनी पोलिस कर्मचारी पठाण यांचे आभार मानले असुन सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button