ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मतदार नोंदणी कॅम्प संपन्न
ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मतदार नोंदणी कॅम्प संपन्न

ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मतदार नोंदणी कॅम्प संपन्न
परवेज मुल्ला, कळंब : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी मतदाराची नोंदणी कार्यक्रम जाहीर केला असून या अंतर्गत ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे दिनांक 2 डिसेंबर 22 वार शुक्रवारी विशेष मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली.
कळंब तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नव मतदारांची नोंदणी बाबत 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असून या अंतर्गत तहसीलदार मुस्तफा खोंदे, श्री. किशन सांगळे नायब तहसीलदार निवडणूक विभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे मतदार नोंदणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले यामध्ये मतदार नोंदणी व मतदान करणे याबाबत नव मतदारांचे प्रबोधन करण्यात आले.
या वेळी डॉक्टर अशोक मोहेकर, सचिव ज्ञान प्रसारक मंडळ, प्राचार्य डॉ. सुनील पवार, हनुमंत जाधव, शेख साजिद, प्राध्यापक अरविंद शिंदे, रमेश भालेकर यांची उपस्थिती होती.
या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सुशील फुलारी विस्तार अधिकारी शिक्षण तथा स्वीप पथक प्रमुख, खलील शेख, शंकर पाचभाई प्रशांत घुटे, दीपक चाळक अशोक डिकले, प्रशांत सलगरे, शहा, हरिश्चंद्र नथाडे आदींनी परिश्रम घेतले.