डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट निवडणूक जाहिर…
अधिसभेसाठी २६ नोव्हेंबरला होणार मतदान तर २८ नोव्हेंबरला मतमोजणी व निकाल जाहिर होणार..

उस्मानाबाद, तुळजापूर प्रतिनिधी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक कार्यक्रम दि.२६ आॅक्टोबर २०२२ रोजी जाहीर झाला. दि.२६ नोव्हेंबरला मतदान होणार असून २८ नोव्हेंबरला निकाल घोषित केला जाईल, विद्यापीठातील जाहीर केलेल्या कालावधीत ज्या पदवीधरांनी निवडणुकीसाठी नोंदणी केलेली आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार असेल.विद्यापिठाचे रजिष्टार यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
विद्यापीठाचे संचालन अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून केले जाते.विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर यासाठी मतदान करतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात.
चालू अधिसभेची मुदत एक महिन्यापूर्वी संपली. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून,२६ नोव्हेंबरला मतदान होईल, तर २८ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
निवडणूक अर्ज भरण्याची तारीख दि. २७ आॅक्टोबर २०२२ ते दि. ०४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत असणार आहे. दि. ५ नोव्हेंबरला अर्जाची छाननी होवून दि. ६ नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. ७ नोव्हेंबर ते दि. १० नोव्हेंबर पर्यंत आक्षेपावरती, बाद अर्जावरती सुनावणी घेऊन अंतिम यादी दि. ११ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रत्यक्ष मतदान हे दि. २६ नोव्हेंबर ला तर मतमोजणी ही दि. २८ नोव्हेंबरला होणार आहे अशी माहिती या निवडणूकीतील इच्छूक उमेदवार मनसेचे धाराशिव जिल्हासंघटक तथा श्री तुळजा भवानी मातेचे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी यावेळी बोलताना दिली.