आरोग्यपुणे

थेरगाव हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे दहा वर्षाच्या मुलीचा अपघात

थेरगाव हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे दहा वर्षाच्या मुलीचा अपघात

संजय ताटे, थेरगाव: प्रभाग क्रमांक 23 धनगर बाबा मंदिराच्या मागं संत ज्ञानेश्वर कॉलनी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अंतर्गत काम चालू आहे, थेरगाव हॉस्पिटलच्या मागं भोंगळा कारभार मुळे व त्यांच्या आशीर्वादामुळे एका दहा वर्षाच्या मुलाचा अपघात झाला आहे, त्याला 5 टाके पडले आहे त्या मुलाला ठेकेदार व इंजिनीयर चुकीमुळे दिनांक 26-09-2021 हा अपघात घडला.

त्याच्या नंतर अजून ठेकेदार व इंजिनीयर वर कारवाई झाली नाही त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेश सचिव युनुस पठाण त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना पत्र देऊन ठेकेदार व इंजिनियर वर कारवाई झाली पाहिजे म्हणून त्यांनी आयुक्त पत्र दिले कारवाई नाही झाल्यामुळे युनूस पठाण यांनी मा. श्री. पी. पी. वावा, पत्र देऊन ठेकेदार व इंजिनीयर कारवाई झाली पाहिजे व मुलाचा झालेला खर्च पूर्ण दिला पाहिजे असं पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील त्यांना ठेकेदार व इंजिनिअर वर कारवाई करावा असं आदेश दिला आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी मुलाला न्याय देवा अन्यथा लवकरच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेश सचिव युनूस पठाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे हेजोपर्यंत मुलाला न्याय मिळणार नाही वर ठेकेदार इंजिनिअर वर कारवाई होत नाही तोपर्यंत युनूस पठाण व पदाधिकारी शांत बसणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button