आगामी नगरपालिका निवडणुका मनसे ताकदीने स्वबळावर लढणार – दादा कांबळे

आगामी नगरपालिका निवडणुका मनसे ताकदीने स्वबळावर लढणार – दादा कांबळे
परवेज मुल्ला, उस्मानाबाद: आगामी नगरपालिका निवडणुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे नेते दिलीप (बापू) धोत्रे, सरचिटणीस संतोष (भाऊ) नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार असुन सर्व वार्डात उमेदवार उभे करणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आतापर्यंत शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यात शहरात जेंव्हा पाणी टंचाई निर्माण झाली तेव्हा मागेल त्याला पाणी मनसेच्या माध्यमातून दोन टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जवळ जवळ सर्व वार्डात पाणी पुरवठा केला त्यामुळे ५० हजार नागरिकांना पाणी मिळाले, मेडीकल कॉलेज व्हावे यासाठी सर्वात अगोदर स्वाक्षरी मोहिम घेतली त्या स्वाक्षरी मोहिमेत शहरातील ८५०० नागरिक सहभागी झाले होते.
तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये होणारी लुट मनसेमुळे थांबली याचा फायदा हजारो पालकांना, व विद्यार्थ्यांना झाला, तसेच शहरातील व खड्ड्यासाठी मनसेच्या माध्यमातून अंदोलने करून खड्डे बुजवण्यास प्रशासनाला भाग पाडले, तसेच शहरातील विविध समस्या बाबत वेळोवेळी आंदोलने केली आहेत याचा फायदा आगामी निवडणुकीत मनसेला होईल तसेच कोविड (कोरोना) च्या काळात शेकडो लोकांना अन्नधान्य वितरण, जेवण वाटप, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, इंजेक्शन करिता प्रयत्न करणे, लोकांचे असे एक ना अनेक मदतकार्य या काळात केले आहेत.
तसेच लवकरच शहर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे तरी मनसेमध्ये शहरातील मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहेत तरी ज्यांना कोणाला मनसेमध्ये प्रवेश घेऊन सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर खालील मो. नं. सम्पर्क ८८०५१६४०४०. असे अहवान मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी केले आहे.