राज्य मंत्रिमंडळातून नवाब मलिक यांची हकालपट्टी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कळंब यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन..

नवाब मलिक

राज्य मंत्रिमंडळातून नवाब मलिक यांची हकालपट्टी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कळंब यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन..

परवेज मुल्ला, उस्मानाबाद: मंत्रि मंडळातील सहकार राज्यमंत्री नवाब मलिक यांना देशद्रोही दाऊद इब्राहिम यांच्या मालमत्ता खरेदी प्रकरणातील मनी लँड्रीग प्रकरणात आरोपी म्हणून अटक केली आहे. हे फक्त भ्रष्टाचाराचे प्रकरण नसून देशद्रोहाची संबंधित आहे.

कट्टर देशभक्त म्हणून ज्यांची ख्याती होती असे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपण सुपुत्र आहात, आणि आपल्याच मंत्रिमंडळातील सहकारी थेट मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम व त्यांच्या जवळच्या लोकांच्या मालमत्तेच्या खरेदीबाबतच्या गैरव्यवहारात आरोपी म्हणून कोठडीत आहे, तरी आपण त्यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी कळंब यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले.

यावेळी भाजपचे कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, तालुका उपाध्यक्ष बजरंग शिंदे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिनाज शेख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, सरचिटणीस बालाजी मडके, शिवाजी शेंडगे, इम्रान मुल्ला, सुधीर कोकीळ, अशोक क्षीरसागर, आकाश गायकवाड, आण्णा कसबे, शिवहरी शिंदे, सुनील ताटे, दिपक गवळी, अभिजित पवार, बापू माने आदी उपस्थित होते.

नवाब मलिक
राज्य मंत्रिमंडळातून नवाब मलिक यांची हकालपट्टी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कळंब यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन..