नितीन गडकरीची मोठी घोषणा; देशात डिसेंबर 2024 पूर्वी होणार हा बदल

नितीन गडकरीची मोठी घोषणा; देशात डिसेंबर 2024 पूर्वी होणार हा बदल

नितीन गडकरीची मोठी घोषणा; देशात डिसेंबर 2024 पूर्वी होणार हा बदल

केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी ( Union Transport & Road Minister Nitin Gadkari ) यांनी एक मोठी घोषणा केली आहे, मंगळवारी लोकसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी देशाच्या मूळ रचने बद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. या वेळी त्यांनी आज अमेरिकेसारखे किती देश श्रीमंत झाले, भारत कसा मागे राहिला हे ही सांगितले.

गडकरी म्हणाले की, अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत कारण अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे असे नाही, तर अमेरिका हा श्रीमंत देश आहे कारण त्याच्या कडे चांगले रस्ते आहेत. लोकसभेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, भारताला समृद्ध करण्यासाठी मी खात्री देतो की डिसेंबर 2024 पूर्वी आमचे रस्ते ( India’s road infrastructure ) अमेरिकेपेक्षा चांगले असतील.

हे पण वाचा: PUNE | मांजरी उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा; अन्यथा आंदोलनचा इशारा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीर मध्ये ७,००० कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. सुमारे 1000 लोक झोजिला बोगद्यामध्ये -8 अंश सेल्सिअस तापमानात काम करत आहेत. दिल्ली-अमृतसर-कटरा महामार्गाचे काम ही सुरू झाले आहे.

या वर्षाच्या अखेरीस, आम्ही श्रीनगरहून २० तासांत मुंबईला पोहोचू शकू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी लोकसभेत सांगितले की, टोल प्लाझा जवळ राहणाऱ्या स्थानिक लोकांना आम्ही पास उपलब्ध करून देऊ. तसेच, मी खात्री देतो की ६० किलोमीटरच्या आत एकच टोल प्लाझा असेल, जर दुसरा टोल प्लाझा असेल तर तो पुढील ३ महिन्यांत बंद केला जाईल.