पुणे जिल्यात प्रवीणभाऊ राठोड यांच्या जन्मदिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम संपन्न.

पुणे जिल्यात प्रवीणभाऊ राठोड यांच्या जन्मदिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम संपन्न.
पुणे प्रतिनिधि: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, पोलीस मित्र, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीणभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थान बकोरी गाव येथील अनाथ मुलांना फळे वाटप करण्यात आली. व तसेच संस्थेमधील एका विद्यार्थिनीचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
व तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन लोणीकंद येथील पोलिसांना कोविंड वॉरियर्स सन्मानपत्र देऊन करण्यात आले या सन्मान पत्राचा स्वीकार पोलीस निरीक्षक माननीय श्री गजानन पवार साहेब यांनी केला.
यावेळी संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुंडे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासदादा पठारे, महाराष्ट्र समन्वयक इसा शेख, प्राध्यापक डॉक्टर डी बी धावारे सर, हवेली तालुका अध्यक्ष हसन भाई शेख, अनिल गायकवाड, मेहबूब भाई शेख, भरत चव्हाण, परमेश्वर कांबळे, रशीद भाई पठाण व मीडिया सेल महाराष्ट्र प्रमुख जाकिर पठाण आदी उपस्थित होते.