प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध सोडा अन्यथा राज्यभर जेलभरो आंदोलन करू

प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध सोडा अन्यथा राज्यभर जेलभरो आंदोलन करू
परवेज मुल्ला, उस्मानाबाद: काँग्रेस पक्षाच्या नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी लखिंमपुर खेरी येथील शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांची अडवणूक केली त्यांच्याशीही पोलिसांनी गैरवर्तन केले व शेवटी बेकायदेशीर अटकेचा निषेध करून प्रियंका गांधी यांना सोडा अन्यथा राज्यभर जेलभरो आंदोलन करू असे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उस्मानाबाद च्या वतीने भाजप व उत्तर प्रदेश योगी सरकार चा विरोधात जाहीर निषेध कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे, व किसान मोर्चात बसलेल्या शेतकऱ्यांवर बाजूने कारवाई करण्याच्या ऐवजी पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे, तसेच शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्तीचे निदर्शक असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करा.
लखिंमपुर खेरी येथे शेतकरी नरसंहारच्या निदर्शक असून शेतकर्यांना चिरडणाऱ्या मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात लखीमपुर खेरी येथे झालेल्या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, व या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी लखिंमपुर खेरी येथील शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांची अडवणूक केली त्यांच्याशीही पोलिसांनी गैरवर्तन केले, व शेवटी बेकायदेशीर अटकेचा निषेध करून प्रियंका गांधी यांना सोडा अन्यथा राज्यभर जेलभरो आंदोलन करू असे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उस्मानाबाद च्या वतीने भाजप व उत्तर प्रदेश योगी सरकार चा विरोधात जाहीर निषेध करत आहोत जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई सपाटे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार महिला तालुकाध्यक्ष अंजली ढवळे, वैशाली धावारे, संगीता पांचाळ भागवतराव धस, शहाजी रितापुरे, नासर शेख, कमलाकर पाटील, सारिका कापसे, वनमला पांचभाई, वर्षा बांगर, दिपाली उमाप, नितीन अंगरखे, किरण मेंडके, बालाजी पवार आदी उपस्थित होते.