मा. कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेबानी आज पुण्यातील, मुळशी मधील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मा. कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेबानी आज पुण्यातील, मुळशी मधील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पुणे, मुळशी: सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), कोकण (kokan) भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती (Flood) ओढावली हे आपण सर्वच जनता आहे, असाच या अतिवृष्टीचा एक तडाका हा पुण्यामधील मुळशी भागात पण आपणास पाहण्यास मिळेल, आज दि. ०३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक मा. कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेब यांनी मुळशी तालुक्यतील लावासा, टेंबर, खारावडे, भुगाव, येथे जाऊन या भागातील पावसामुळे सर्वसामान्य जनतेचं व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला.
यावर लवकरात लवकर राज्य सरकारने या भागातील शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी त्यांनी प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना फोनवरून येतील परिस्थितीची माहिती दिली, आणी सांगितले एवढं नुसकान होऊन एक ही सरकारी अधिकारी येथे आध्यप पोहोचलेला नाही, स्वतः मा. जानकर साहेब यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व मुळशी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड चे प्रतिनिधी संजय ताटे उपस्थित होते.