मंदीर हम खुलवायेंगे धर्मको न्याय दिलवायेंगे कळंब येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात भाजपाचे आंदोलन…

मंदीर हम खुलवायेंगे धर्मको न्याय दिलवायेंगे कळंब येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात भाजपाचे आंदोलन…

मंदीर हम खुलवायेंगे धर्मको न्याय दिलवायेंगे कळंब येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात भाजपाचे आंदोलन…

उस्मानाबाद: राज्यातील धार्मीक स्थळे व मंदीरे खुली करण्यात यावीत. या मागणीसाठी भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज राज्यभर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी शंखनाथ आंदोलन पुकारले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कळंब येथे दक्षिण मुखी हनुमान मंदिर कळंब परिसरात भारतीय जनता पार्टी कळंबच्या वतीने टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले, तर महाविकास आघाडीचे सरकार हे गोरगरीबांचे नसून वसूली सरकार आहे. हे सरकार निव्वळ बदल्यांच्या नावाखाली देखील आता वसूली करण्याचे काम करीत आहे. जर मंदिर खुली करायची नसतील तर बार,हाॕटेल तरी कशाला उघडी ठेवायची म्हणत टिका केली.

या वेळी आंदोलन करते कळंब भाजपा तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, अरुण चौधरी, नागजी घुले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार, संदीप बाविकर, सतपाल बनसोडे, माणिक बोंदर, आबासाहेब रणदिवे, विशाल ठोंबरे, आबासाहेब गायकवाड, बंटी चोंदे, राजाभाऊ कोल्हे, गणेश देशमुख, मुन्ना झटाळ, अशोक क्षीरसागर, सिद्धार्थ भोसले, रियाज पठाण, बापू माने, आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.