उस्मानाबाद

नागरिकांनी संविधानाचे वाचन करावे – डॉ. मिनाक्षी भवर

सर्व नागरिकांनी संविधानाचे वाचन करावे - डॉ. मिनाक्षी भवर

सर्व नागरिकांनी संविधानाचे वाचन करावे – डॉ. मिनाक्षी भवर

परवेज मुल्ला, कळंब : स्वाभिमानाने,ताठ मानेने आणि अधिकाराने जगायचे असेल तर संविधानाचे वाचन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी शिंदे-भवर यांनी केले.

शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.५ डिसेंबर २०२२ रोजी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशिय संस्था आयोजित संविधान सप्ताहात ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधान ज्ञान परीक्षेतील प्रथम मुक्ताई गुणवंत देशमुख, द्वितीय वेदिका दिपकराव कुलकर्णी, तृतीय प्रिती विक्रम पांचाळ व ३१ सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ डॉ. मिनाक्षी शिंदे-भवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जयचंद कुपकर, सामाजिक कार्यकर्ते सतपाल बचुटे, प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशिय संस्थेचे अविनाश घोडके आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे पुढे म्हणाल्या की, संविधान जनजागृतीसाठी प्रबुद्ध रंगभूमी संस्थेने केलेल्या उपक्रमातुन विद्यार्थ्यांमधून सजग व कर्तव्यदक्ष नागरिक तयार होतील. या वेळी प्राचार्य जयचंद कुपकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा. सूर्यभान सोनवणे, प्रा. लालासाहेब धोंगडे, प्रा. राजेंद्र खडबडे, प्रा. राजाभाऊ माळी, प्रा. गोविंद दोरगे, प्रा. दिंगबर गपाट, सामाजिक कार्यकर्ते सतपाल बचुटे, अनिल शेळके, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर तोडकर, बन्सी सोनवणे, रवी कांबळे, प्रा. संगीता कदम, प्रा. शितल शिंदे, प्रा. निता म्हेत्रे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यभान सोनवणे यांनी केले तर आभार अविनाश घोडके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button