युनुस भाऊ पठाण युवा मंच यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गरजूना छत्री वाटप.

युनुस भाऊ पठाण युवा मंच यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गरजूना छत्री वाटप.
पुणे, थेरगाव: आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती हि थेरगावत युनुस भाऊ पठाण युवा मंच यांचे आध्यक्ष युनुस भाऊ पठाण यांच्या वतीने प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून गरजूना छत्री वाटपाचा कार्यास सुरुवात करण्यात आली.
युनुस भाऊ पठाण युवा मंच सं. अध्यक्ष मा. युनुस भाऊ पठाण हे पिंपरी चिंचवड शहारमध्ये नेहमीच समाज कार्यात कौतुकास्पद कार्य करत असतात, मा. युनुस भाऊ पठाण यांना देखील “कोविड योद्धा” म्हणुन अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे, एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार साहेब यांनी देखील यांचा सन्मान केला आहे.
आज युनूस पठाण यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आणखी एक समाजहिताचे कार्य म्हणजेच निराधार गोरगरीब रस्त्यावर फिरणारे गरीब कुटुंबांमध्ये नागरिकांना खरोखरच ज्या व्यक्तींला गरज आहे, अशा व्यक्तींना छत्री वाटपाच्या कार्यक्रमत छत्री वाटप करण्यात आले.