कोविंड योद्धा युनूस पठाण यांची परत एक कौतुकास्पद कामगीरी.

कोविंड योद्धा युनूस पठाण यांची परत एक कौतुकास्पद कामगीरी.
प्रभाग क्रमांक 23 थेरगाव धनगर बाबा मंदिराच्या माग एकता हौसिंग सोसायटी मधील प्रदीप दरगुडे यांचा युनूस पठाण यांना फोन आला की माझा मित्र तेचा ड्रायव्हर जेसीपी चा ड्रायव्हर आहे, पवार नगर गणपती मंदिराच्या शेजारी राहत आहे, जहीर अन्सारीला पुणे ससून हॉस्पिटल मधील मुलगा झाला पण 20 मिनिटांनी डॉक्टर ने मृत्यू घोषित केलं, अश्या त्यावेळी युनूस पठाण रात्रीच्या बाराच्या सुमारास भर पावसात पुणे ससून हॉस्पिटल मधील पोहोचले व बाळाला ताब्यात घेऊन तेचे वडील व त्यांचे कुठले ही नातेवाईक काही कारणास्तव अंत्यविधीला वेळेवर हजर राहू शकले नाहीत.
अशावेळी युनूस पठाण माणुसकीच्या नात्याने पिंपरी चिंचवड मधील रात्री 2 वाजता लींक रोड मुस्लिम दफनभूमी मधील दफन करून दिले, पुणे ससून हॉस्पिटल यांनी यु. पठाण यांचा कौतुक आणि आभार व्यक्त केले, युनूस पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेश सचिव आहे, त्यांना समाजसेवा करण्यासाठी पहिल्यापासून आवड आहे नेहमीच दिवस व रात्र असू द्या त्यांना कोणी पण फोन केलाकि ते धावून जातात.
तर नेहमीच त्यांनी कुठली ही जात-धर्म न बघता ते सर्वांनाच मदत करत असतात, कोविंड च्या काळात त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत 93 करुणा पॉझिटिव्ह अंत्यविधी विनाशुल्क जाती धर्मानुसार अंत्यविधी करून दिली आहेत, त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्र त्यांना बोलून सत्कार केला जात आहे.