आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदुत संघटना कडुन महाराष्ट्रात पुरगस्तासाठी विशेष मदत

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदुत संघटना कडुन महाराष्ट्रात पुरगस्तासाठी विशेष मदत.

आज महाराष्ट्रामध्ये कोकण, सातारा, सांगली व कोल्हापूर भागामध्ये पुरस्थीती मुळे येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे.

हे पुर्व पदावर येण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व प्रशासन कार्यरत आहे, त्यात बरोबर एक छोटासा सहभाग म्हणून अंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना भारतीय महाक्रांती सेना,  संघटनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबाना साडी ब्लॅंकेट, सॅनिटरी नॅपकिन्स, स्यानिटीझर, टॉवेल, अन्न धान्य चे वाटप हे करण्यात आले.

यासाठी डॉ.अविनाश साहेब संकुडे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच मा. प्रविण राठोड, आंतरराष्ट्रीय युवा अध्यक्ष – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, राष्ट्रीय उपाध्यक्ष – माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. याचे विशेष योगदान लाभले. यासाठी महीला उपाअध्यक्ष व कार्यकर्ते याांनीही उपस्थिती दर्शवली.