एसटी महामंडळ राज्य चिटणीस या पदावर व्यंकट बिराजदार

एसटी महामंडळ राज्य चिटणीस या पदावर व्यंकट बिराजदार
लातूर: आज शासकीय अतिथीगृह लातुर येथे एसटी महामंडळ राज्य चिटणीस या पदावर व्यंकट बिराजदार यांची तसेच शिवसेना व्यापारी आघाडी लातूर तालुका संघटक रफीक नाना शेख, उप जिल्हा संघटक एस आर चव्हाण, उप शहर संघटक संपतकुमार बंग, लातूर तालुका आडत अससोसिएशन प्रमूख काकासाहेब सुर्यवंशी यांची निवडझाल्याबद्दल या सर्वांचा सत्कार व सन्मान सोहळा लातुर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
व्यापारी आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या लातुर महानगरपालिका निवडणुकीमध्ये व्यापारी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या अधिक अधिक जागा निवडुन आणण्यासाठी अनमोल वाटा घ्यावा व निवडून आणावे अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी व्यापारी आघाडी सेनेचे जिल्हा संघटक बसवराज मंगरुळे, युवासेना संपर्क प्रमुख सूरज दामरे, सी. के मुरळीकर, महानगर प्रमुख विष्णू साठे, लातूर तालुका प्रमुख बाबुराव शेळके, माजी नगरसेवक सतीश देशमुख, सुनील बसपुरे, युवासेना जिल्हाधिकारी कुलदीप सुर्यवंशी, वैद्यकीय मदतकक्षाचे डॉ.सगर सर, उपजिल्हाधिकारी रवी पीचारे, तालुका सचिव महादेव काळे, विधानसभा संघटक कैलास पाटील, विभाग प्रमुख सिद्धेश्वर जाधव, सोमनाथ स्वामी, वव्यापारी आघाडी पदाधिकारी निजाम हुच्चे, नागेश कोळपे, मुन्ना स्वामी, चंद्रकांत कांबळे व अन्य पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.