शिवसेना महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी रुक्साना बागवान तर शहर अध्यक्ष धनश्री कवडे यांची निवड.

शिवसेना महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी रुक्साना बागवान तर शहर अध्यक्ष धनश्री कवडे यांची निवड.

शिवसेना महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी रुक्साना बागवान तर शहर अध्यक्ष धनश्री कवडे यांची निवड.

कळंब: शिवसेना कळंब तालुका महिला आघाडी प्रमुख पदी रुकसाना बागवान तर शहरप्रमुख पदी सौ.धनश्री रुपेश कवडे यांची नियुक्ती करण्यात आली, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आ.कैलास दादा पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शामलताई वडणे, तसेच तालुकाप्रमुख श्शिवाजी आप्पा कापसे यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

पक्ष संघटना बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे आणि महिला सक्षमीकरणाचे निर्णय सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण सतत कार्यशील रहाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, कळंब शिवसेना संपर्क कअर्यलात हा निवडीचा कार्यक्रम पार पडला. पंकज काळे, मुकुंदराजे शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी सौ. योजना वाघमारे, सौ.सुनंदा कापसे, शहर अध्यक्ष प्रदीप मेटे,नगरसेवक मुस्ताक कुरेशी, अनंत वाघमारे, सतीश टोणगे, श्याम नाना खबाले, रोहन पारख, अजित गुरव,डॉ.रुपेश कवडे,सुरेश शिंदे , सागर बाराते, सचिन काळे आदी उपस्थित होते.