महाराष्ट्र
संजय घोगरे यांची उस्मानाबाद भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
संजय (बापू) घोगरे यांची उस्मानाबाद भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

संजय (बापू) घोगरे यांची उस्मानाबाद भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
परवेज मुल्ला, उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील एकुरगा येथील संजय बापु घोगरे हे कॉंग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तसेच जिल्हास्तरीय पदेभुषवुन अनेक कामे केलेली आहेत, त्यांनी नुकतेच काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेस (आय) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
याची दखल घेऊन माजी मंत्री आ. राणा जगजीतसिंग पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांनी संजय (बापू) घोगरे यांची उस्मानाबाद भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र दिले. या वेळी तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, भाजपा युवा मोर्चा कळंब तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, संतोष भांडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.