सलमान खानला साप चावल्याची बातमी: रुग्णालयात दाखल, काय झाले ते जाणून घ्या.

सलमान खानला साप चावल्याची बातमी: रुग्णालयात दाखल, काय झाले ते जाणून घ्या.
Salman Khan Bitten by Snake: काल रात्री सलमानला साप चावला. त्यावेळी ते त्यांच्या पनवेलच्या फार्महाऊसवर होते, असे सांगण्यात येत आहे. साप चावल्यानंतर तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बॉलिवूड अभिनेता सलमान ची प्रकृती सध्या ठीक आहे. हा साप विषारी नसल्यामुळे फारसा त्रास झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तानुसार, सलमानच्या हाताला सापाने चावा घेतला असून ही घटना काल रात्री 3.30 च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. साप चावल्यानंतर सलमान खानला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. सलमानला चावणारा साप विषारी नव्हता, त्यामुळे त्याला कोणताही धोका नव्हता.
सलमानला डिस्चार्ज?
सलमानवर रात्रभर रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ते त्यांच्या फार्म हाऊसवर विश्रांती घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीनंतर सलमानचे चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सलमानच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही ही सलमानच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे.