शहर पत्रकार संघाचे (Journalists Association) प्रथम अधिवेशन पिंपरी-चिंचवड मध्ये मोठया उत्साहात संपन्न.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची अधिवेशनाला हजेरी...

शहर पत्रकार संघाचे (Journalists Association) प्रथम अधिवेशन पिंपरी-चिंचवड मध्ये मोठया उत्साहात संपन्न.
पिंपरी, 19 नोव्हेंबर 2022 (श्रीकांत गाढवे, अधिवेशन विशेष) पत्रकारितेत या असे निमंत्रण तुम्हाला कोणी दिले नाही. त्यासाठी पायघड्या घातल्या नाहीत. त्यामुळे पत्रकारितेतील सुख, दुःख डोक्यावर घ्यावी लागतील. ग्लॅमरला भुलू नका. पत्रकारितेला सामाजिक दायित्वाची झालर आहे. त्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी वागायला हवे, अशी अपेक्षा राजकीय विश्लेषक श्री. अशोक वानखेडे सर यांनी व्यक्त केली.
अखिल मराठी पत्रकार संस्था (Journalists Association) संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रथम अधिवेशन शनिवारी पिंपरी मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात तसेच आनंदात पार पडले.
मराठी पत्रकारितेचे जनक ज्यांना आपण बोलतो ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ह्या कार्यक्रमास सुरुवात झाली.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी अनेक मान्यवर उपस्तित होते जसे कि, माजी नगरसेवक, जेष्ठ पत्रकार श्री. मधु जोशी होते. मावळचे खासदार श्री. श्रीरंग बारणे, शिवसेनेचे राज्य संघटक, जेष्ठ पत्रकार श्री. गोविंद घोळवे, महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते श्री. राहुल कलाटे, जेष्ठ पत्रकार श्री. दीपक मुनोत, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते, पत्रकार संघाचे सल्लागार श्री. यशवंत भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) वाहतूक आघाडीचे श्री. अजीज शेख, महाराष्ट्र कामगार सेनेचे श्री. केशव क्षीरसागर, श्री. अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते, श्री. संजय सोळंकी, श्री. रजणीत कलाटे, पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक श्री. बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष श्री. दादाराव आढाव इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्तित होते.

जेष्ठ पत्रकार श्री. विनायक चक्रे, श्री. माधव सहस्त्रबुद्धे, श्री. मदन जोशी सर आणि छाया-चित्रकार श्री. नरेश नातू, श्री. यशवंत नामदे, श्री. अतुल मारवाडी यांचा हि यावेळी सन्मान करण्यात आला.
श्री. अशोक वानखेडे म्हणाले, “पत्रकारांच्या प्रश्नावर मंथन झाले पाहिजे, शहरातील पत्रकारिता बाईट पत्रकारिता झाली आहे, ग्रामीण भागातील पत्रकारांनी पत्रकारिता जीवंत ठेवली आहे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पत्रकार लिहितात.
तसेच, पत्रकारांनी सामान्य माणसासारखे रहावे त्यातच तुमचे अर्धे प्रश्न सुटतील. पत्रकारांनी एकोप्याने राहून आपली कौशल्य वाढवावीत, शिवाय पत्रकारांनी 24 तास सतर्क राहिले पाहिजे.
जेष्ठ पत्रकार श्री. मधु जोशी सर म्हणाले, “पत्रकारांनी नेहमी बोलते असेल पाहिजे, टीव्ही चॅनेलचे वृत्त निवेदक बातमी संगण्या ऐवजी काही जण किचळतात, ओरडतात. हे चुकीचे आहे.
ओरडणे, किंचाळने ही काय पत्रकारिता नव्हे”. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. बापूसाहेब गोरे यांनी केले. रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी सूत्रसंचालन केले. तर, सुनील कांबळे यांनी आभार मानले.