शेतकऱ्यांच्या (light bill) विज बिलापोटी तोडलेले कनेक्शन जोडून वीज बिल माफ करावे – भाजप कळंब.

light bill

शेतकऱ्यांच्या ( light bill ) विज बिलापोटी तोडलेले कनेक्शन जोडून वीज बिल माफ करावे – भाजप कळंब.

परवेज मुल्ला, कळंब, उस्मानाबाद: शेतकऱ्यांच्या ( light bill ) विजबिलापोटी तोडलेले कनेक्शन जोडून वीज बिल माफ करावे यासाठी कळंब तालुका भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना व रब्बी हंगामात वीज पुरवठा सक्तीची वीज वसुली बंद करून कृषि पंपांचा तोडलेला वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश तत्परतेने व्हावेत, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर भाजपा तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, प्रशांत लोमटे, माणिक बोंदर, संजय जाधवर, बजरंग शिंदे, संदीप बाविकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.