उस्मानाबादमहाराष्ट्र

कौडगाव MIDC मधून ५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती सुरू!

कौडगाव MIDC मधून ५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती सुरू!

उस्मानाबाद: आपल्या संकल्पनेतून उस्मानाबाद शहरालगत कौडगाव MIDC येथे साकारलेला ‘महानिर्मितीचा’ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून ५ मेगावॅट ऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या इन्व्हर्टर रूमची पूजा करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री. पवन रायफळे यांचा सत्कार देखील करण्यात आला.

आपल्या मागणी नुसार तत्कालीन ऊर्जा मंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांनी कौडगाव येथे ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली होती, परंतु अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्यानंतर सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने कामाला मान्यता मिळवून दि. १९ सप्टेंबर २०१९ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते, मार्च २०२० अखेर हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते.

पुण्याच्या कंपनीने बनवली ‘चोरी’ करून कोरोनाची लस! 7200 कोटी रु. दावा दाखल

मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर मागील २ वर्षे या प्रकल्पाचे काम ठप्प होते, प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता, गेल्यावर्षी दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी कौडगाव MIDC येथे परिसरातील ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन या कामाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्या नंतर राज्य सरकारला सज्जड इशाराही दिला होता.

महाजनकोचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यन्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ऊर्जा मंत्री ना. श्री. नितीन राऊत यांच्यासह विधिमंडळा मध्ये याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून कौडगाव MIDC येथून ५ मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे. सदरील प्रकल्प ५० मेगावॅट क्षमतेचा असून पुढील ३ महिन्यांत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची ग्वाही महाजनकोचे कार्यकारी संचालक श्री.संजय खंदारे यांनी दिली आहे.

सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे उशिरा का होईना परंतु जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लागत आहे, ही बाब काही अंशी समाधानकारक आहे. मात्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषय अजूनही प्रलंबित आहे. कौडगाव MIDC येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाची नितांत आवश्यकता असून यास देखील नक्कीच यश मिळेल असा विश्वास आहे.

आता इंटरनेट शिवाय WHATSAPP! ही ट्रिक जाणून घ्या

उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा असून उद्योग मंत्री ना.श्री.सुभाष देसाई यांनी येथे येऊन बैठक घ्यावी, यासाठी आपण आग्रही आहोत. राज्य सरकारने याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यास त्यास तात्काळ मंजुरी मिळवून घेऊ असा विश्वास आहे.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री. सुनील काकडे, आंबेजवळगाचे सरपंच श्री. आनंद कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. राजसिंह राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष श्री. राहुल काकडे, तालुकाध्यक्ष श्री. ओम नाईकवाडी, श्री. कुलदीपसिंह भोसले, श्री. हिंमत भोसले, श्री. मेसा जानराव, श्री. शेषेराव उंबरे, श्री. संदीप इंगळे, श्री. प्रवीण सिरसाठे, श्री. प्रीतम मुंडे, श्री. दाजीप्पा पवार, श्री. सुजित साळुंके, श्री. सागर दंडनाईक, श्री. आप्पासाहेब नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button