OBC आरक्षणासाठी २६ जूनला महाराष्ट्रात आंदोलन – बीजेपी नेत्या पंकजा मुंडे

OBC आरक्षणासाठी २६ जूनला महाराष्ट्रात आंदोलन – बीजेपी नेत्या पंकजा मुंडे
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर, आता सर्वोच्च न्यायालयाने OBC प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणाला ही स्थगिती दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकार ओबीसीं (OBC) ची बाजू मांडण्यात कमी पडले असल्यामुळे, ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झालं आहे, असा आरोप माजी ग्रामविकास मंत्री, पंकजा मुंडे यांनी केला आहे. या विरोधात त्यांनी 26 जून रोजी सर्व राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या महाविकास आघाडी सरकार पुढे ओबीसीच्या (OBC) आरक्षणाचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे. मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत असताना, माजी ग्रामविकास मंत्री, पंकजा मुंडे म्हणाल्या की, ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, हा विषय केवळ भाजप पक्षापुरता मर्यादित नसून, तो राज्यातील सर्व पक्षांच्या ओबीसी नेत्यांचा आहे. त्यामुळे आम्ही ओबीसींच्या हितासाठी काही ही करण्यास तयार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी सांगितले आहे की, आज पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी २६ जून, रोजी आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहोत. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही. सत्तेवर असणाऱ्या मंत्र्यांना भरपूर अधिकार असतात, तसेच सरकारला ही अधिकार असतात. त्यावेळी आमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता होती.
तसेच योग्य निर्णय घेण्याची नियत होती. त्यामुळे आम्ही हे आरक्षण टिकून ठेवण्यासाठी पावले उचलली होती. त्या संदर्भात अध्यादेश काढले होते. मात्र या सरकारची मानसिकता ओबीसींच्या संदर्भात योग्य नाही, त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी, आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे.