Pune: पोलीस मित्र संघटना पुणे शहर संपर्क प्रमुख अमितजी सातकर यांच्या कडुन अनोख्या पद्धतीने पुरग्रस्त भागात मदत.

Pune: पोलीस मित्र संघटना पुणे शहर संपर्क प्रमुख अमितजी सातकर यांच्या कडुन अनोख्या पद्धतीने पुरग्रस्त भागात मदत.

पुणे: (Pune) एक हात मदतीचा पूर आला, पाणी चढल, पणी उतरलं… बोलायला आनी ऐकायला किती सोपं वाटत ना? पण इतक सोपं नसतं हे सगळं.. ज्यांच्या उंबऱ्याला पणी लगत, त्यांनाच त्याची दाहकता समजते.

पाई पाई जमा केलेला संसार अचानक भिजून जातो कुजून जातो, नसतं पचायला सोपं, अगदी जीवापाड जपून ठेवलेली वस्तू पुराच्या पाण्यात वाहून जाते, कुजून जाते त्या वस्तू सोबत कितीतरी आठवणी जोडलेल्या असतात त्या सहजपणे विसर्जित होतात, येणाऱ्या मदतीने बहुतेक गरजा भागत असल्या तरी गेलेली माणसं पुन्हा आणण केवळ अशक्य.

आपण ती माणसं जरी पुन्हा आणू शकत नसलो तरी आपली जबाबदारी आपलं कर्तव्य म्हणून हे, गाव-खिद्रापुर, तालुका-शिरोळ, जिल्हा-कोल्हापुर कृष्णा नदीच्या काठावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले, महाराष्ट्रातील शेवटचे गाव.

नैसर्गिक अतिवृष्टी मुळे गावातील घरे व शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अनेकांचे संसार,घरदार व शेती उध्वस्त झाली.त्यात लहान मुले व वयस्कर लोकांची अवस्था तर फारच मनाला चटका लावणारी होती.अशा संकटात सापडलेल्या आपत्तीग्रस्त बांधवांना.

पोलीस मित्र संघटना पुणे (Pune) शहर व रयत संघटनेच्या माध्यमातून अत्यावश्यक साहित्य, खाद्य पदार्थांची पाकिटे व रेशन किट च्या स्वरुपात प्रत्यक्ष जागेवर जाऊन वितरित करण्यात आले.

यावेळी पोलीस मित्र संघटना-संपर्क प्रमुख श्री. अमित सातकर, रयत जिल्हा सरचिटणीस अजय सावंत, करण झा, अनिल गिरी, विकेश जगताप उपस्थित होते. तसेच खिद्रापुर गावातील अमित कदम, बाळासो देसाई, मंगेश पाटील, प्रकाश पाटील, रणजीत पाटील यांनी मोलाची मदत व मार्गदर्शन केले.

Pune: पोलीस मित्र संघटना पुणे शहर संपर्क प्रमुख अमितजी सातकर यांच्या कडुन अनोख्या पद्धतीने पुरग्रस्त भागात मदत.