Pune: सत्तारूढ पक्षनेत्यांच्या पत्राने वाचला “खुर्चीचा लिलाव”.

Pune: सत्तारूढ पक्षनेत्यांच्या पत्राने वाचला

Pune: सत्तारूढ पक्षनेत्यांच्या पत्राने वाचला “खुर्चीचा लिलाव”.

पे अँड पार्किंग चा विषय सभागृहात मांडण्याचे ” अपना वतन ” ला दिले लेखी आश्वासन.

▪️▪️▪️
पुणे, पिंपरी-चिंचवड: (Pune) प्रशासन व राजकीय नेते पे अँड पार्कींच्या प्रश्नावर गंभीर नसल्याने अपना वतन संघटनेने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यालयावर आंदोलनाचा धडाका लावला आहे. यामध्ये महापौर माई ढोरे यांच्या कार्यालयावर ठिय्या, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या कार्यालयावर पे अँड पार्किंगच्या ठरावाची होळी करण्यात आली होती.

आज शनिवार दि. ७/०८/२०२१ रोजी अपना वतन संघटनेच्या वतीने सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या कार्यालयावर सत्तारूढ पक्षनेत्यांच्या खुर्चीचा लिलाव हे आंदोलन करण्यात येणार होते.

परंतु चिंचवड पोलीस स्टेशने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे व पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांच्या पुढाकाराने सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्याशी सकारत्मक चर्चा घडून आली.

या चर्चेदरम्यान अपना वतन चे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी जनतेची बाजू मांडताना सांगितले कि, शहराच्या विकास आराखड्यामध्ये पार्किंगसाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन विकसित करावेत, कंपन्यांमधील कामगारांना आर्थिक भुर्दंड बसू नये. तसेच छोट्या मोट्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पार्किंचे पैसे भरावे लागू नये.

पार्किंगसाठी रस्त्याचा वापर न करता जागा उपलब्ध करून द्याव्यात तसेच नागरिकांच्या सूचना व हरकतीचा विचार केला जावा. नियोजनबद्ध व भविष्यच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असा आराखडा तयार करेपर्यंत सध्याचे पार्किंग धोरण रद्द करावे.

नामदेव ढाके यांनी अपना वतन संघटनेच्या मागण्यांचा सकारत्मक विचार करून सभागृहात पे अँड पार्किंगचा विषय घेऊन त्यावर चर्चा करणार असल्याचे लेखी पत्र अपना वतन संघटनेला दिले, त्यावेळी अपना वतचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी अपना वतनचे पिंपरी चिंचवड कार्यध्यक्ष हमीद शेख, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, संघटक निर्मला डांगे, संगीता शहा, दीपक खैरनार, ओबीसी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड, लक्ष्मण पांचाळ, तौफिक पठाण, विशाल निर्मल, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील, गणेश पाटील, गणेश जगताप, रियाज शेख, समीर अत्तार, केशव बुडगल यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune
▪️▪️▪️