पुणे

Pune | मांजरी उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा; अन्यथा आंदोलनचा इशारा

Pune | मांजरी उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा; अन्यथा आंदोलनचा इशारा

पुणे: Pune मांजरी उड्डाणपुलाचे (Manjri Flyover) काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे काम बंद आहे.

त्रस्त नागरिकांनी उड्डाणपुला जवळ घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या नंतरही कामाला गती न आल्यास हडपसर व्हिजन मांजरी बुद्रुक (Hadapsar Vision Manjari Budruk, Pune) येथे नागरिक कृती (Work Committee) समितीच्या वतीने आंदोलन (Protest) करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा: BJP ला मतदान केल्यामुळे सासरच्या मंडळीकडून घटस्फोटाची धमकी, महिलेला मारहाण करून घराबाहेर…

मांजरी रेल्वे उड्डाणपुलाचे (Manjari Railway Flyover) काम अनेक महिन्यांपासून बंद असल्याने मांजरी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अशा स्थितीत मांजरी येथील काही नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी येऊन हे काम त्वरित करण्याची मागणी केली. यावेळी मांजरी बुद्रुक अजय शिंगोटे (Ajay Shingote), गणेश खांदवे (Ganesh Khandve), संदीप लहाने (Sandeep Lahane), सतीश गावडे ( Satish Gawade), सूरज घुले (Suraj Ghule), भाऊ पवार (Bhau Pawar), अण्णा कापरे (Anna Kapre), राहुल कराळे (Rahul Karale), नवनाथ जाधव (Navnath Jadhav), विनायक अभंग (Vinayak Abhang), व्हिजन सदस्य अनिल मोरे (Anil More) आदी नागरिक उपस्थित होते.

हडपसर व्हिजन मांजरी बुद्रुक नागरी कृती समितीचे सदस्य अजय शिंगोटे म्हणाले की, मांजरी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे लोकांना (Hadapsar) हडपसरला जाण्यासाठी 5 किमीचा प्रवास करावा लागत आहे.

अनेक महिन्यांपासून हा पूल बंद आहे. त्यामुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. विनायक अभंग म्हणाले, “माझे घर उड्डाणपुला जवळ आहे, घराच्या समोरून ड्रेनेज (Drainage Line) लाइन गेली आहे, ड्रेनेज चेंबर पुलाच्या उतारावरून गेले आहे. चेंबर भरले की माझ्या घरात पाणी शिरले असते. होय, मी अनेकवेळा येथील प्रशासनाला कळवले आहे, पण कोणीही लक्ष देत नाही (Pune).

हे पण वाचा: IPL 2022: लखनऊला मार्क वुडचा पर्याय, पहिल्यांदाच खेळणार IPL

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे (Hadapsar Assembly Constituency) आमदार चेतन तुपे ( MLA Chetan Tupe) म्हणाले की, लोकांचा रोष रास्त आहे, राज्य सरकारने (State Government) रेल्वे रुळांच्या कामासाठी पैसे दिले आहेत, रेल्वेने सांगितले होते, 6 महिनाभरात काम करू मात्र आतापर्यंत रेल्वेने काम का केले नाही, हे समजलेले नाही. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. आता काम सुरू झाले नाही तर खासदार डॉ.अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांच्या माध्यमातून दिल्लीत अधिकाऱ्यांची भेट घेऊन जनतेच्या समस्या त्यांच्या समोर ठेवू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button