पुणे

शिवम (SHIVAM) प्रतिष्ठान आयोजित गुरुजन हृदय संमेलन 19 व शनिवार 20 रोजी घारेवाडी ता. कराड

शिवम (SHIVAM) प्रतिष्ठान आयोजित गुरुजन हृदय संमेलन 19 व शनिवार 20 रोजी घारेवाडी ता. कराड

पुणे: शिवम (SHIVAM) प्रतिष्ठान घारेवाडी ता-कराड येथे आदरणीय इंद्रजित देशमुख यांचे मार्गदर्शनानुसार प्रतिवर्ष शिक्षकांसाठी गुरुजन हृदय संमेलन आयोजित करण्यात येते. या वर्षी शुक्रवार दिनांक 19 व शनिवार 20 रोजी गुरुजन हृदय हे दोन दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाचे उद्घाटन पुणे विद्यापीठ चे माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ यांचेहस्ते व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ यांचे उपस्थितीत होणार आहे.

बीजभाषण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण (डायट) चे प्राचार्य तथा शिक्षण तज्ञ डॉ. गजानन पाटील यांचे होणार आहे.दिवाळीच्या सुट्टीनंतर इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गरम्य अशा शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी, ता. कराड, जिल्हा सातारा येथे शिक्षक वर्गासाठी १९,२० नोव्हेंबर ,२०२१ रोजी होणाऱ्या गुरुजन हृदय संमेलन-२०२१ मध्ये शिक्षकांसह शिक्षणप्रेमीनागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष राहुल पाटील यांचेकडून करण्यात येत आहे.

या (SHIVAM) शिबिरासाठी मार्गदर्शक श्री. संगीता पुंड अध्यापिका – विद्या मंदिर वाशी, कोल्हापूर मा. सुचेताताई पडळकर (संचालिका-सृजन आनंद, कोल्हापूर ) मा. स्वामीराज भिसे (समन्वयक-सांस्कृतिक विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मा. डॉ. राजन गवस (ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ ) व इंद्रजित देशमुख हे असणार आहेत. या शिवाय शिक्षकांसाठी गटचर्चा, कृतीसत्र, प्रयोगशीलता याचेही मार्गदर्शन होणार आहे.

विनायक माळी, सुहास प्रभावळे, विनायक हिरवे, प्रकाश गाताडे, प्रमोद धायगुडे, शशिकला पाटील, पुनम साळुंखे यांचेकडून संमेलनाची पूर्वतयारी झाली आहे. शिवम् चे सुहास पाटील, धनंजय पवार व सर्व विश्वस्त, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, साधक संमेलन यशस्वी करण्यासाठी सज्ज आहेत. सर्व शिक्षकांसाठी निवास व भोजन व्यवस्था आहे. महिला शिक्षक यांचेसाठी सर्व स्वतंत्र व्यवस्था आहे.

नाव नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने करता येईल. राज्य भरातून या संमेलनास उदंड प्रतिसाद मिळत असून गुरुजन हृदय संमेलनातील दोन दिवस वैचारिक संवादाचा लाभ जिल्ह्यातील शिक्षकांसह शिक्षण प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन राहुल पाटील, महेश मोहीते, प्रताप भोसले. प्रताप कुंभार यांचेकडून करण्यात आले आहे.

SHIVAM
शिवम (SHIVAM) प्रतिष्ठान आयोजित गुरुजन हृदय संमेलन 19 व शनिवार 20 रोजी घारेवाडी ता. कराड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button