विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद प्रशासकीय परिषदेवर निवड

विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद प्रशासकीय परिषदेवर निवड.
लातूर: विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांची भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (ICMR), नवी दिल्ली येथील परिषदेच्या (Governing Council ) प्रशासकीय परिषद या पदावर निवड झाली आहे.
या निवडीबाबत भारतीय विश्वविद्यालय संघाचे महासचिव डॉ. पंकज मित्तल यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे प्राध्यापक तथा कुलगुरू डॉ.करमालकर यांना कळविले आहे, डॉ. सुधीर देशमुख यांची निवड मतदानाद्वारे झाली आहे, या निवड प्रक्रियेसाठी भारतातील सर्व राज्याच्या विद्यापीठातील कुलगुरुंनी मतदान केले आहे.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी शिखर संस्था आहे, डॉ. सुधीर देशमुख यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकशास्त्राच्या संशोधनास चालना मिळणार आहे. डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता यांच्या निवडीबाबत शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी माने बालाजी रेड्डी यांच्या सुचनेवरुन विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अभ्यागत मंडळाचे सदस्य त्र्यंबक गुरुनाथ स्वामी यांनी अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
त्याप्रसंगी ऊपअधिष्ठाता तथा जनसंपर्क अधिकारी डॉ.ऊदय मोहिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोषकुमार डोपे, सहयोगी प्राध्यापक तथा शल्यचिकित्सक शास्त्र, अध्यक्ष महात्मा फुले जन आरोग्य योजना डॉ.मेघराज चावडा, सहयोगी प्राध्यापक तथा शरीर विक्रती शास्त्र डॉ.ऊमेश कानडे, सहयोगी प्राध्यापक तथा बालरोग तज्ज्ञ डॉ विकास साळुंखे, डॉक्टर शिवप्रकाश मुंदडा, यांचेसह सर्व विभागप्रमुख, सर्व अध्यापक, सर्व कर्मचारी वर्ग यांनी आज अभिनंदन केले.