आवृत्ती पुणे
← Back to Homepage

“उत्तुंग भरारी” सन्मान सोहळ्यात मान्यवरांचा गौरव

पुणे : समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे समाजाला मिळणारी प्रेरणा. जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम यांच्या वतीने आयोजित “उत्तुंग भरारी सन्मान सोहळा” नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात आनंद भंडारी (जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भुमी), शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग), विजय बाविस्कर (ग्रुप एडिटर, लोकमत महाराष्ट्र-गोवा), अभिजीत डुंगरवाल (एडिटर, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र जैन वार्ता), संदीप गादिया (सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन एक्सपर्ट), प्रकाश धोका (उद्योगपती व समाजसेवक) आणि नंदिनी वाग्यांनी (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर) यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भंडारी (अध्यक्ष, जीतो अपेक्स) होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती,कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती होती.२५ एप्रिल २०२५ रोजी, शुक्रवार, संध्याकाळी ६.३० वाजता, शराव लॉन्स, तुळजा भवानी मंदिर समोर, एम.आय.टी. कॉलेज रोड, कोथरूड, पुणे येथे हा भव्य सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे संयोजन रामलाल शिंगवी (संस्थापक अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम) आणि प्रकाश भंडारी (अध्यक्ष) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पंचवटकर यांनी केले, तर अनिल लुंकड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी मंचावर दिलीप मेहता, डॉ. सुमतीलाल लोढा, सचिन लोढा, प्रदीप गांधी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

get_footer();