आवृत्ती पुणे

तोतया पोलिसाने नोकरीच्या अमिषाने घातला गंडा

महापालिकेत नोकरीचा बहाणा : दागिने गहाण ठेवून दिले ५ लाख रुपये महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर पोलीस ठाणे, युनिट ५ मध्ये पोलीस अधिकारी असल्याचे सांगून नातीला महापालिकेच्या जन्म-मृत्यू खात्यात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका तोतयाने महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली. केतन दादासाहेब साळुंखे (वय ४०, रा. कुशल वाटिका सोसायटी, लोणी काळभोर) असे या … Read more

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यावसायिकाच्या कार्यालयातील कामगाराने १० लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामगाराविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलीप पुखराज ओसवाल (वय ५७, रा. वर्धमानपुरा, गंगाधाम चौक) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अखिलेश बसंतलाल वर्मा (रा. पुरोह, प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा … Read more

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

वेदविहार सोसायटीचे चेअरमनसह कार्यकारिणी सदस्यांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या आवारात बसविण्यासाठी आणलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीतील अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत तिचे … Read more

नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

डेक्कन पोलिसांनी एकाला अटक करून अल्पवयीन साथीदाराला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डेक्कन येथील भिडे पुलाजवळील नदीपात्रात तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. आर्थिक वादातून हा खून करण्यात आल्याचे डेक्कन पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. ओंकार गणेश कांबळे (वय २७, रा. दत्तवाडी) … Read more

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

विवाहाच्या आमिषाने २६ लाखांना गंडा : मॅट्रोमोनिअल साइटवर फेक अकाउंटवरून फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देशातील नामांकित अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपी विवाहविषयक संकेतस्थळावरून महिलांशी ओळख करून त्यांची फसवणूक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४, रा. … Read more