आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एच. एन. डी. जैन बोर्डिंगमध्ये भगवान महावीरांना अभिवादन

पुणे : भगवान महावीरजींचा २६२३व्या जन्मकल्याणक महोत्सव एच. एन. डी. जैन बोर्डिंगमधील मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बोर्डिंगचे विद्यार्थी, सर्व जैन समाज बांधव व जैन इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यावेळी मंगलाष्टके, महावीरांचा महामस्त्याभिषेक, भव्य आरती व महावीरांचा पाळणा, भजने, भव्य शोभायात्रा इत्यादी कार्यक्रमाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोर्डिंगचे विश्वस्त चकोर गांधी, सुरेंद्र गांधी, चंदन शहा, बाबुभाई दोशी, अभिजीत शहा, क्षमा अजमेरा, पदमजी अजमेरा, अरविंद जैन, अनिल जैन, शशांक जिंतूरकर, स्वप्नील पाटणी, अंकित जैन, डॉ. प्रगती जैन, शैलेश जैन, जितू तातेड, एड. योगेश पांडे, दिलीप शेठी, वर्षा शेठी इत्यादी श्रावक वर्ग उपस्थित होता.

यावेळी समाजाचे दानशूर अनिल लोढा परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बोर्डिंगचे विश्वस्त चकोर गांधी, अधीक्षक सुरेंद्र गांधी यांनी जन्मकल्याणक महोत्सवाचे उत्तम नियोजन केले होते.

get_footer();