आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही : मनोज जरांगे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल

भूम : जीवात जीव व शेवटच्या श्वासापर्यंत मराठा समाजाची निष्ठा कमी न होऊ देता ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे यांनी भूम येथील संवाद बैठकीमध्ये समाज बांधवांना संबोधित करत असताना सांगितले.

ते म्हणाले, सरकारने माझ्यावर एसआयटी चौकशी नेमली आहे याचे कारण काय तर मी यांच्या आईबद्दल बोललो. परंतु हेच सरकार ज्यावेळी आमच्या आई बहिणींवर लाठी चार्ज करून कसलाही विचार न करता विटाणे मारत होते. त्यांच्यावर गोळ्या सुद्धा झाडल्या. या आमच्या मातामाऊली तुमच्याही माता माऊली नव्हती का, असा प्रति प्रश्न जरांगे यांनी राज्य सरकारला विचारला.


यावेळी चौंडेश्वरी सभागृहामध्ये समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा यासह विविध घोषणा देत जरांगे यांना आता फक्त उपोषण न करता आरक्षण लढा शांतते तीव्र करावा असे आवाहन केले. यावेळी जरंगे म्हणाले,”उद्यापासून आत्ता आपल्या समाज बांधवांनी एक झेरॉक्स काढायचे आहे. त्यावर मराठा नेत्यांना उद्देशून लिहायचे आहे, आमच्या लेकरासाठी तुम्ही अधिवेशन मध्ये आवाज उठवला नाही.

यामुळे आमच्या दरात तुम्ही मत मागण्यासाठी यायचे नाही. माझे आणि छगन भुजबळ यांचे चालू होते. मध्येच देवेंद्र फडणवीस यांना यायची काय गरज होती. त्यांनी हाताने स्वतःच्या आणि पक्षाच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. १० टक्के आरक्षण दिले उभ्या महाराष्ट्रात याचे समाज बांधवाने स्वागत केले नाही. म्हणून मराठा बंधवावर गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू केले.

भूम येथील आंदोलनात नवर देव आंदोलनाला बसले होते म्हणून त्यांच्यवर वर गुन्हा नोंद केला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आत्ता समाज बांधवांनी मला एकजुटिने सात द्यावी. कारण मी जेलमध्ये जरी गेलो तरी तिथे मी आंदोलन सुरू करतो तुम्ही बाहेर आंदोलन सुरू करा.

१० टक्के आरक्षण द्यायचे आहे तर ओबिसितून द्या व ५० टक्केच्या आत आरक्षण द्या आम्ही तुमच्या सोबत आरक्षणाचा गुलाल उधळतो. मराठा समाज मागास आहे याचा आव्हान सरकारला दिला आहे. यासह ५७ लाख मराठा बांधव यांच्या कुणबी नोंदी सोपडून देखील तुम्ही मराठ्यांना आरक्षण का देऊ शकत नाहीत याचे उत्तर सरकारने द्यावे.

एक इंचही आमच्या हक्काचे ओबीसी आरक्षण घेतल्या शिवाय मी मागे हटणार नाही तुम्ही फक्त आवाज दिला की अंतरवली सराटीत दाखल व्हा असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();