आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कारागृह बंदीनी केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 16, 2024

मकर संक्रांतिनिमित्त येरवड्यात आयोजन

पुणे : मकर संक्रांतिनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आले.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतुन कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विक्री मेळावा व प्रदर्शनामध्ये बंद्यांनी सागवान लाकडापासुन तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तु, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, विस्कीट, तीळाच्या वड्या, हलव्याचे दागिने, पतंग तसेच इतर सर्व देनंदीन वापराच्या वस्तु उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
“सुधारणा व पुनर्वसन” हे कारागृह विभागाचे ब्रीद आहे. कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो. त्यामुळे निश्चितच त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात व त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार बंद्यांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.
विक्री केंद्रामार्फत बंदी निर्मित वस्तुंची विक्री करण्यात येते. विविध सणांचे औचित्य साधुन बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मकार संक्रांत सणानिमित्त यावर्षी बंद्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शन व विक्री मेळाव्यास सामान्य नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सामान्य नागरीकांना अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या कारागृह बंदी निर्मित विविध वस्तु उपलब्ध असुन त्याचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन अधीक्षक सुनिल एन ढमाळ, यांनी केले.
या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक बी. एन. ढोले, उपअधीक्षक पल्लवी कदम, उपअधीक्षक मंगेश जगताप आनंदा कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी एस. एम. पाडुळे, कारखाना व्यवस्थापक सी. आर. सांगळे, काराखाना तुरुंगाधिकारी, येरवडा मध्यवर्ती कारागृह व इतर अधिकारी/तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.

get_footer();