आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुन करणाऱ्या आरोपीला ८ तासामध्ये केले जेरंबद

भारती विदयापीठ पोलीसांची कारवाई

पुणे : खुन करणऱ्या अज्ञात आरोपीचा छडा लावुन ८ तासामध्ये जेरंबद करण्यात भारती विदयापीठ पोलीसांना यश आले आहे. किसन मरगळे (वय-२१ रा. साईनगर गल्ली नं.०३ सच्चाईमाता पाण्याचे टाकीजवळ आंबेगाव बु.) असे आरोपीचे नाव आहे.

कात्रज भाजी मंडई पुणे-सातारा रोड, कात्रज कडून संतोषनगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला फिर्यादी यांचे वडिल मनोहर बागल यांना कोणीतरी अज्ञात इसमाने दगड किंवा कशाच्या तरी सहायाने मारहाण करुन, त्यास गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले आहे. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने लागलीच वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भारती विदयापीठ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी घटना स्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमे-याव्दारे शोध घेत असताना, पोलीस अंमलदार, हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, यांना आरोपीबद्दल माहिती मिळाली.
आरोपी हा तळजाई पठार जंगलामध्ये अंधारात लपून बसला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी संपूर्ण तळजाई जंगल परिसरात जाऊन रात्रीच्या अंधारामध्ये आरोपीचा शोध घेतला असता तो तेथील झाडा-झुडपा मध्ये लपून बसलेला असल्याचे मिळुन आले. त्याला पोलीस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन, त्याच्याकडे अधिक तपास करता, तो दारु पित असताना मयताचा धक्का त्याला लागल्याच्या कारणावरुन त्यातून झालेल्या वाद-विवादातून मयताच्या डोक्या मध्ये दगड मारुन जीवे ठार मारले असल्याचे त्याने कबुली दिली. त्यावरुन आरोपीस गुन्हयात अटक केली आहे.
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी खुनाचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा ८ तासाच्या आतमध्ये उघडीस आणून कौशल्यपूर्ण कामगिरी केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२,स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक, (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, विश्वास भाबड, पोलीस उप निरीक्षक, धिरज गुप्ता, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश जमदाडे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, अभिजीत जाधव, राहुल तांबे, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();