आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गंभीर दुखापत करुन चोरी करणारे २ आरोपी गजाआड

मुंढवा पोलीसांची कामगिरी

पुणे : गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणारे २ आरोपी गजाआड करण्यात मुंढवा पोलीसांना यश आले आहे.

अक्षय शिंदे (वय २५ वर्षे, रा. कॉलनी नंबर १०, संकेत विहार, डिरे कंपनीजवळ, काळेपडळ, हडपसर) महेंद्र शेलार, (वय ४५ वर्षे, रा. सव्र्व्हे नंबर २३१, निर्मल टाऊन जवळ, काळेपडळ, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे.

रात्री २.३५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी युक्तीकुमार निंबाळकर,( रा. पुनावळे इमारत, शिंदे वस्ती, जय महाराष्ट्र चौक, केशवनगर, मुंढवा,) हे मोटार सायकलवरुन चैतन्यबार, केशवनगर मुंढवा पुणे येथून जात होते. त्यांना रिक्षा चालक यांनी अडवून जवळ हॉटेल कोठे आहे, जवळ आहे का असे बोलण्यामध्ये गुंतविले. रिक्षामधील मागे बसलेल्या व्यक्तींनी खाली उतरुन गचंडी पकडून हाताने मारहाण केली.

एकाने दगडाने डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन बळजबरी पॅन्टच्या खिशामध्ये हात घालून रोख रक्कम रुपये ७,००० काढून घेऊन पळुन गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळाची पाहणी करुन या घटनेची माहिती घेतली.

या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना रवाना केले. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन मुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी हे दाखल गुन्हयातील आरोपीचा केशवनगर पोलीस चौकी भागात शोध घेत होते.

पोलीस अंमलदार महेश पाठक यांना माहिती मिळाली की “गुन्हयात वापरलेली रिक्षा कल्याणी बंगला रोड मोकळया मैदानात उभी आहे” या माहितीनुसार माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता त्यांनी योग्य ती कायदेशीर ठोस कारवाई करण्यासाठी सुचना दिल्या.

त्याप्रमाणे या ठिकाणी जाऊन रिक्षाची खात्री केली असता या रिक्षामध्ये दोन व्यक्ती मिळुन आले, त्यामधील एक व्यक्ती अपंग असल्याचे दिसले. फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्णनाची खात्री झाली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक, महादेव लिंगे यांच्या सुचनाप्रमाणे त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार पोलीस सहआयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे, सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्ग, संतोष काळे, देवानंद खाडे, सचिन मेमाणे, निलेश पालवे, सचिन पाटील, दयानंद गायकवाड यांनी केली आहे.

get_footer();