आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दत्तनगरमध्ये खुन करुन पसार झालेल्या आरोपीस अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे : कात्रज ते नवले ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्तनगर बस स्टॉपजवळ आंबेगाव बुद्रुक येथे झालेल्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिन्याभरातच तपास करुन एकाला शिताफीने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ५ मे २०२४ रोजी विलास जयवंत बांदल (वय ५५ वर्षे रा. कात्रज पुणे) यांचे डोक्यात, तोंडावर दगड व वीट घालुन त्यांना जिवे ठार होते. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अभिषेक विलास बांदल यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी व तपास करण्यासाठी पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, सचिन गाडे यांनी घटनास्थळ ते दत्तनगर, तसेच कात्रज हायवेवरील सर्व आस्थापनांचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक केले.

तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहीती घेतली असता नमुद गुन्हयातील मयत विलास बांदल यांचा खून त्याचाच मित्र संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर (वय ४५ वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) याने जमीनीच्या वादातुन केल्याचे समजले. आरोपी कोणताही मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे त्याचा शोध घेण्यास व त्याला पकडण्यास अडचणी निर्माण होत होत्या.

त्यामुळे आरोपीस पकडण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करुन आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर हा रावडी (ता. भोर, जि. पुणे) या गावात त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रावडी (ता. भोर) येथे जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अवधतु जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();