आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नफ्याचे आमिष दाखवून चाळीस लाखाची फसवणुक

कोथरूड पोलीस स्टेशन : महिलेकडून उकळली रक्कम

पुणे : मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून चाळीस लाखाची फसवणुक केल्याची घटना कोथरूड पोलीस ठाण्याच्या हदीत घडली आहे.

ऑनलाईन टास्कच्या माध्यमातून अनोळखी इसमाने मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सुरूवातीस काही प्रमाणात नफा देवून महिलेचा विश्वास संपादन केला व त्यांची मूळ रक्कम तसेच नफा असे एकूण ४०,६८,५९५/- इतक्या रकमेची फसवणूक केल्याची घटना कोथरूड पोलीस ठाण्याच्या हदीत घडली आहे.

याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने (रा. रामबाग कॉलनी, पौड रोड, पुणे) फिर्याद दाखल केली आहे. माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतेर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ मे ते २७ मे पर्यंत आरोपीने वेळोवेळी नफ्याचे प्रलोभन दाखवून ही रक्कम उकळल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम यांनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शी बोलताना सांगितले.

get_footer();