आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

पुणे : नराधम पिताच आपल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जवळपास वर्षभर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कोणाला काहीही सांगायचे नाही, नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी जवळपास वर्षभर आपल्या बापाचा अत्याचार सहन करत होती.

याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३७ वर्षाच्या वडिलांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार डिसेंबर २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या वडिलांनी फिर्यादीला हाताने मारहाण करुन बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरात कोणालाही काहीही सांगायचे नाही, नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी दिली. फिर्यादीशी वारंवार शरीरसंबंध ठेवून तिला शारीरीक व मानसिक त्रास दिला.

ही बाब तिच्या आईला माहिती झाली. पण, या नराधमाच्या भितीपायी ती काही करु शकत नव्हती. शनिवारी सायंकाळी त्याने या मुलीवर पुन्हा अत्याचार केला. हा असहाय्य प्रकार तिची आई जेथे घरकाम करते, त्यांना सांगितला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आई मुलीला घेऊन कोंढवा पोलीस ठाण्यात आली. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर करीत आहेत.

get_footer();