आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्राईडतर्फे घर कामगार व महिला पोलिसांचा सन्मान

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Social • March 11, 2024

भुम : प्राईडतर्फे महिला दिनानिमित्त घर कामगार व महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने आपल्या कुटुंबाला पुढे घेउन जाण्यासाठी लोकांची धुणी-भांडी करणाऱ्या महिला कामगारांचा व आपले कुटुंब सांभाळून पोलीस खात्यातील अवघड कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उदघाटन पोलिस उपनिरीक्षक वर्षा साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्या कल्याणी असलकर यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळेतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील घरकाम करणाऱ्या महिला कामगार मेघा जव्हेरी, पार्वती राऊत, सुवर्णा ढगे, रेणुका बोत्रे, रुकमीन राऊत, जयश्री पंडारे, बबिता ताई व मीना कोकणे यांचा पोलिस उपनिरीक्षक वर्षा साबळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. तर महिला पोलीस कर्मचारी रेखा काळे, शबाना मुल्ला, वैशाली राजपूत यांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला.

यावेळी बोलताना वर्षा साबळे म्हणाल्या की, आपण महिला आहोत म्हणजे समाजाचा सृजनशील वर्ग आहोत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्या हक्कासाठी आपण हिमतीने पुढे आले पाहिजे. त्यासाठी पोलीस म्हणून मी सदैव आपल्या सोबत असेन. यावेळी महिला पालकांसाठी चित्र पाहून म्हणी ओळखा व तळ्यात मळ्यात या स्पर्धा घेण्यात आल्या.

यामध्ये सरला बागडे व प्रियांका असलकर या विजयी झाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा सुपेकर यांनी केले तर आभार चैताली टकले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका दिपीका टकले, सरस्वती पाटील यांच्यासह अरुणा बोत्रे व आशा म्हेत्रे यांनी परिश्रम केले.

get_footer();