आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बोरा परिवारांचे पहिले अखिल भारतीय राष्ट्रीय संमेलन संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • April 16, 2026

पुणे : अखिल भारतीय बोरा फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने बोरा परिवारांचे पहिले अखिल भारतीय एकदिवसीय राष्ट्रीय संमेलन पुण्यात अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडले. गंगाधाम चौकाजवळील श्री वर्धमान सांस्कृतिक केंद्र येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित या संमेलनास देशभरातून बोरा समाजातील हजाराहून अधिक सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी वडगाव धायरी श्री जैन श्रावक संघाचे अध्यक्ष तसेच सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते प्रकाश सुखलाल बोरा, पुण्यातील प्रख्यात सीए सुहास प्रेमसुख बोरा, जैन कॉन्फरन्सचे माजी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश झुंबरलाल बोरा आणि बांधकाम व्यावसायिक संजय कांतीलाल बोरा (मिरजगावकर) यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पुखराज राजमल बोरा उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्योजक सौरभ हेमराज बोरा, इच्छाबाई इंद्रकुमार बोरा, अतुल इंद्रकुमार बोरा, राजेंद्र, सतीश व अजित बोरा (तीळवाले), प्रशांत प्रकाश बोरा, अशोक उर्फ बाबुशेठ सिमरतमल बोरा, तसेच प्रशांत प्रीतम बोरा यांचा समावेश होता. विशेष पाहुणे म्हणून निवृत्त सहाय्यक आयकर आयुक्त खुशालचंद नथमल बोरा व समुपदेशक जितेंद्र सुखराज बोरा उपस्थित होते.

यावेळी मुख्य पाहुणे पुखराज बोरा व मुख्य वक्ते प्रशांत बोरा (बोरा मल्टी कॉर्प) यांच्यासह खुशालचंद, जितेंद्र, डॉ. स्मिता, सतीश (एआय इंजिनियर) व बाबुशेठ बोरा यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त करत बोरा समाजाच्या एकता व सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास बोरा यांनी केले, तर स्वागतपर भाषण संजय बोरा यांनी सादर केले. प्रकाश झुंबरलाल बोरा यांनी आभार प्रदर्शन केले. या संमेलनाची संकल्पना प्रकाश सुखलाल बोरा यांनी मांडली होती.

दुपारच्या सत्रात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये युवा उद्योजक करण अतुल बोरा, ॲड. संकेत सुहास बोरा, स्विमर डॉ. केविन महेश बोरा, आर्टिस्ट कु. प्रणीता प्रविण बोरा, क्रिकेटर कु. रश्मी नवनीत बोरा, समाजकार्यकर्त्या ॲड. कु. कोमल प्रशांत बोरा, मिसेस एशिया ग्लोबल क्वीन २०२६ किमया पियुष बोरा व टनेल इंजिनियर कु. इला नवनीत बोरा यांचा समावेश होता.


सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांनी संमेलनाची रंगत अधिकच वाढवली. संदीप पंचवाटकर यांच्या म्युझिक तंबोला तसेच लकी ड्रॉ उपक्रमांनी उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. हे संमेलन अत्यंत संस्मरणीय ठरले असून, या यशस्वी आयोजनामुळे बोरा परिवारात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संमेलनादरम्यान झालेल्या चर्चासत्रात बोरा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध समित्या स्थापन करण्याचा तसेच दरवर्षी अशा संमेलनांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

get_footer();